तरुण भारत

परमवीरचक्र विजेत्यांचे मानधन 1 कोटीपर्यंत वाढविणार

प्रतिनिधी / बेंगळूर

देशाच्या सैन्यदलात असाधारण कामगिरी करून परमवीरचक्रसह विविध शौर्य पुरस्कार मिळविणाऱया राज्यातील जवानांना राज्य सरकारकडून 25 लाख रुपये मानधन देण्यात येते. ही रक्कम 1 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केली आहे.

1971 च्या भारत-पाक युद्धाच्या 50 व्या विजयोत्सव वर्षानिमित्त विधानसौध आवारात आयोजित ‘सुवर्ण विजय वर्ष’ कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या परमवीरचक्र पुरस्कार मिळविलेल्या जवानांना देण्यात येणारे 25 लाख रुपये मानधन 1 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल. त्याचप्रमाणे अशोकचक्र विजेत्या जवानांना दिले जाणारे मानधन 25 लाखांवरून 1 कोटी रु., महावीरचक्र व  कीर्तीचक्र विजेत्यांना 12 लाख रु. वरून 50 लाख रु., वीरचक्र आणि शौर्यचक्र पुरस्कार विजेत्या जवानांचे मानधन 5 लाख रु. वरून 25 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री बसवराज बोम्माई, आर. अशोक, सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

बिहार निवडणुकीचा निकाल लागताच मुख्यमंत्री बदलेल

Shankar_P

कर्नाटक : संगमेश यांच्या निलंबनानंतर काँग्रेसकडून निषेध

Shankar_P

कर्नाटक : लसीकरणाच्या प्राधान्य यादीत ४.६९ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश

Shankar_P

बेंगळूर: ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी सामन्यावर सट्टेबाजीच्या आरोपाखाली बुकीला अटक

Shankar_P

ड्रॅग रॅकेट: अभिनेत्री संजनाला भेटलो नाही: आमदार जमीर अहमद

triratna

बेळगावसह 5 जिल्हय़ांमध्ये प्रायोगिक टप्प्यात ‘स्वामित्व’

Patil_p
error: Content is protected !!