तरुण भारत

कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी घरातच घेतली लस

सरकारी डॉक्टरांना हिरेकेरूर येथील घरात बोलावून घेतले

प्रतिनिधी / बेंगळूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदारांनी सरकारी इस्पितळांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेऊन नागरिकांसमोर आदर्श ठेवला आहे. मात्र, कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी हावेरी जिल्हय़ातील हिरेकेरूर येथे आपल्या घरातच सरकारी डॉक्टरांकडून लस घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कोविड मार्गसूचीनुसार जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या सरकारी किंवा खासगी इस्पितळांमध्येच कोरोना लस घ्यावी. मात्र, मंत्री बी. सी. पाटील यांनी वैद्यकीय कर्मचाऱयांना आपल्या घरीच बोलावून त्यांनी आणि त्यांच्या पत्नी वनजा यांनी लस घेतली आहे. त्यामुळे कोविड मार्गसूचीचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आपल्या घरासमोर भेटी घेण्यासाठी अनेक जण प्रतीक्षा करत होते. शिवाय सोमवारी अनेक कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक होते. खोकला, ताप आल्यानंतर डॉक्टरांना ज्याप्रमाणे घरी बोलावून चिकित्सा घेतो, त्याप्रमाणे आपण लस घेतली.  यात चूक कोणती? लस घेतल्यानंतर 30 मिनिटे विश्रांती घ्यावी लागते हे आपल्याला माहिती होते. मात्र, कोविड मार्गसूचीबद्दल माहिती नव्हते, अशी सारवासारव मंत्री बी. सी. पाटील यांनी केली आहे.

तालुका वैद्यकीय अधिकाऱयांना कारणे दाखवा

प्रकरणासंबंधी कोविड मार्गसूचीचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून हिरेकेरूर तालुका वैद्यकीय अधिकाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती डीएचओ डॉ. राजेंद्र दोड्डमनी यांनी दिली आहे. जुलै 2020 मध्ये बी. सी. पाटील आणि त्यांची पत्नी, जावई यांच्यासह कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. बेंगळूरमधील निवासस्थानी क्वारंटाईन होवून उपचार घेऊन ते संसर्गमुक्त झाले होते.

Related Stories

हिवाळी अधिवेशन गुरुवारी गुंडाळणार

Patil_p

लैंगिक सीडी प्रकरण: महिलेच्या वडिलांनी बेपत्ता आणि अपहरणाची केली तक्रार

Shankar_P

कर्नाटक : राज्यात ६४५ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Shankar_P

म्हैसूरमध्ये हस्तिदंत तस्करी प्रकरणी पाच जणांना अटक

Shankar_P

एफडीए स्पर्धा परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली

Patil_p

ड्रग्ज प्रकरण : अभिनेत्री संजनाची वैद्यकीय तपासणी करा

Shankar_P
error: Content is protected !!