तरुण भारत

खानापूर बँकेचे संचालक मारुती पाटील यांची ‘तरुण भारत’ कार्यालयाला भेट

खानापूर  : खानापूर को-आप. बँकेच्या पोटनिवडणुकीत विजय संपादन केलेले संचालक मारुती पाटील (कौंदल) यांनी तरुण भारतच्या खानापूर येथील कार्यालयात येऊन संस्थापक कै. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. यावेळी ‘तरुण भारत’ कार्यालयातर्फे पत्रकार प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते मारुती पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खानापूर भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश चव्हाण, खानापूर कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष डी. एम. भोसले, जि. पं. चे माजी सदस्य जोतिबा रेमाणी, भाजपाचे गुंडू तोपिनकट्टी, राजेंद्र रायका, सहदेव नाईक, अनंत पाटील, पुंडलिक कोलेकर, कौंदलचे ग्रा. पं. सदस्य उदय भोसले, ग्रा. पं माजी सदस्य सतीश पाटील, बरगाव ग्रा. पं. चे सदस्य महांतेश पाटील, रवी बडगेर, प्रकाश निलजकर आदी उपस्थित होते. यावेळी मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, जोतिबा रेमाणी, अनंत पाटील आदींची मारुती पाटील यांचा गौरव करणारी भाषणे झाली. उपस्थितांचे स्वागत पत्रकार आप्पाजी पाटील यांनी केले.

Related Stories

अडीच कोटीचे दागिने घेऊन कोल्हापूरचा युवक गायब

Patil_p

रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल सज्ज ठेवा

Amit Kulkarni

म्हाळेनट्टी येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

विजयनगर भागातील कचरा न उचलल्यास ग्रा. पं. वर मोर्चा

Patil_p

चेनस्नॅचिंगच्या घटनेने खळबळ

Patil_p

भावी नगरसेवकांकडून अपेक्षा स्मार्ट सिटी अन् स्वच्छ परिसराची!

Patil_p
error: Content is protected !!