तरुण भारत

गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील एका महिला अधिकाऱयाकडून 6 फेब्रुवारी रोजी शाहुपूरी पोलीस ठाण्यात माझ्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारीला जिल्हा न्यायालयात हजर झालो. पण पोलिसांचे म्हणणे न्यायालयात सादर झाले नसल्यामुळे न्यायालयात हजर करून घेण्यास नकार दिला. सदरची तक्रार मॅट घोटाळा व इतर अर्थिक घोटाळ्यामध्ये कोणतीही तडजोड केली नसल्यामुळे दाखल केली असून हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती जि.प.तील भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी पत्रकार बैठकीत मंगळवारी दिली.

Advertisements

भोजे म्हणाले, 1 मार्चला स्वत: पोलीसात हजर राहून तपास कामात सहकार्य केले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मला न्यायालयासमोर उभे केल्यानंतर सशर्त जामीन मंजूर केला आहे. या तक्रारीनंतर जामीन मिळाल्याशिवाय जिल्हा परिषदेत जायचे नाही असे मी ठरवले होते. त्यामुळे मी अज्ञातवासात गेल्याची अफवा पसरली. पण गेले 20 दिवस जिल्हा परिषदेत न येता मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात राहिलो. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यरत होतो. अनेक सार्वजनिक कामात सहभागी झालो. पण 6 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पोलीस ठाण्यातून किंवा जिल्हा न्यायालयातून कोणतीही नोटीस मिळाली नाही. माझ्यावर दाखल झालेले 354 ए व 509 हे दोन्ही गुन्हे जामीनपात्र असल्यामुळे मला अटक देखील झाली नाही. या कालावधीत मला जिल्हा परिषदेच्या आवारात येण्यासाठी न्यायालय अथवा पोलीसांनी मनाई केली नव्हती. पण राजकीय नैतिकतेसाठी जिल्हा परिषदेत जायचे नाही असे मी ठरवले होते. माझा न्यायालयावर व पोलिसांवर विश्वास आहे. त्यामुळे आगामी काळात न्यायालय व पोलीसांकडे मोबाईलवरील अनेक पुराव्यांसह संबंधित कागदपत्रे सादर करून सहकार्य करणार आहे. त्यामुळे निश्चित न्याय मिळेल याची खात्री असल्याचे भोजे यांनी स्पष्ट केले. या तक्रारीमुळे खचून न जाता आगामी काळातही भ्रष्टाचाराविरोधात तितक्याच ताकदीने आवाज उठवणार असल्याचेही भोजे यांनी सांगितले.

   दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भ्रष्टचारमुक्त अभियान राबविणार

जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार व अनियमितता याबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी येत आहेत. यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या भगसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या यांचा शहिद दिन असलेल्या 23 मार्चपासून लोकांच्या तक्रारी जिल्हा परिषदेत जमा करून घेतल्या जाणार आहेत. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा उपक्रम राबविणार असल्याचे भोजे यांनी सांगितले.

Related Stories

शाहूवाडी तालुक्यात खरीप पेरण्या पुर्ण; बळीराजा मान्सूनच्या प्रतीक्षेत

Abhijeet Shinde

बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये अद्यावत मशिनरी

Abhijeet Shinde

दहावीच्या परिक्षेत मार्क वाढवून देतो असे भासवून विद्यार्थ्याला २२ हजाराचा गंडा

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन सोमवारपासून शिथील

Abhijeet Shinde

कोल्हापूर : निर्बंधात साजरी होणार आज बकरी ईद

Abhijeet Shinde

कोल्हापूर : स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे त्यासाठी सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा – माजी आमदार अमल महाडिक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!