तरुण भारत

सदाशिवनगर येथील नाल्याचे बांधकाम करा

रहिवाशांची आयुक्तांकडे मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथे नाल्याचे बांधकाम नसल्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सततची दुर्गंधी, साचलेल्या दूषित पाण्यामुळे वाढती रोगराई, डासांचा प्रादुर्भाव यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून, या नाल्याचे बांधकाम करण्याची मागणी सदाशिवनगर येथील नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली.

नुकतेच महानगरपालिका आयुक्त जगदीश के. एच. व बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी सदाशिवनगर परिसरात भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी परिसरातील नागरिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे दिले. सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथे असणाऱया खुल्या जागेत गार्डन करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी प्रसाद चौगुले, शरणु गंदीगुडी, बापू चव्हाण, देविदास शेट्टी, विनोद बनघौड व इतर नागरिक उपस्थित होते.

Related Stories

मराठा निगममुळे राज्यातील समाज एकत्र येईल

Omkar B

मच्छेत घर कोसळून दीड लाखाचे नुकसान

Amit Kulkarni

आवश्यक काळजी घेत ख्रिसमस साजरा होणार

Omkar B

कारवार बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

बेंगळूर पोलीस प्रमुखांनी १५ ऑगस्ट पर्यंत कर्फ्यू वाढविला

Abhijeet Shinde

दोन एकरातील ऊस जळून खाक

Patil_p
error: Content is protected !!