तरुण भारत

दिवाकर गंधे स्मृती पुरस्कार किरण ठाकुर यांना जाहीर

प्रतिनिधी / बेळगाव

महाराष्ट्र शासनाच्या ‘लोकराज्य’चे निवृत्त संपादक तथा ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट संगीत आस्वादक कै. दिवाकर गंधे यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारा साहित्य व पत्रकारिता पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. पत्रकारिता सन्मान पुरस्कार बेळगाव ‘तरुण भारत’ चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर आणि महाराष्ट्र टाईम्सचे निवृत्त संपादक अशोक पानवलकर यांना देण्यात येणार आहे.

साहित्य सन्मान पुरस्कार कथा, कादंबरीकार, चित्रपट विषयक लेखन करणारे बहुआयामी साहित्यिक राजेंद्र खेर व ज्येष्ठ कवयित्री संशोधिका प्रा. डॉ. उषा सावंत यांना देण्यात येणार आहे. कै. दिवाकर गंधे स्मृती निधी या संस्थेतर्फे त्यांच्या इच्छा पत्रानुसार दरवषी साहित्य, पत्रकारिता, कला क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. मानचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. त्यांच्या पत्नी दिवंगत शिक्षणतज्ञ व नृत्यप्रवीण कै. सागरिका गंधे यांच्या स्मृत्यर्थ या निधीतून ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना गौरववृत्ती देण्यात येणार आहे.

मार्चअखेरीस होणार समारंभ लोकसत्ताचे निवृत्त मुख्य सहसंपादक रमेश झंवर, उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य अनुवादक तथा साहित्यिक उद्धव कुलकर्णी, ज्येष्ठ समिक्षक रविप्रसाद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते अरूणराव धारप व मिलिंद साने, उद्योजक श्रीनिवास नाईक यांच्या समितीने वरील पुरस्कारार्थींची निवड केल्याचे कै. दिवाकर गंधे स्मृती निधी संस्थेने कळविले आहे. पुरस्कार प्रदान समारंभ मार्च महिन्याच्या अखेरीला होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Related Stories

दिवाळीच्या साहित्यांनी बाजारपेठ बहरली

Patil_p

कंग्राळी बुद्रुक वॉर्ड क्र.1 मधील उमेदवारांचा प्रचार

Patil_p

शहापूर विभाग म.ए.समितीची आज बैठक

Patil_p

खानापूर तालुक्यात रविवारी 3 कोरोनाबाधित

Patil_p

ता.पं.सदस्य-पिडीओंची बैठक घेण्याची मागणी

Patil_p

शहरात मतदान जनजागृती रॅली

Patil_p
error: Content is protected !!