तरुण भारत

सातारा : बनावट टोल पावत्या प्रकरण; संशयितांना पुराव्याअभावी जामीन

सातारा : आनेवाडी आणि खेड शिवापूर टोल नाक्यावरील बनावट पावत्यांच्या गुन्हयात अटक केलेल्या सर्व संशयितांना पुराव्याअभावी शिवाजीनगर न्यायालयाने जामीन दिला. 

पुणे-सातारा महामार्गावर आनेवाडी व खेड-शिवापूर टोल नाक्यावर टोल वसुलीसाठी बनावट पावतीद्वारे पैसे जमा केले जात असल्याची तक्रार पुणे येथील अभिजित वसंत बाबर यांनी दिली होती. यानंतर पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आनेवाडी व खेड-शिवापूर टोल नाक्यावर पंचांच्या समक्ष या प्रकरणाची माहिती घेत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये टोल नाक्यावर पावत्या बनावट असल्याचे सांगत पोलिसांनी . या प्रकरणी सुरेश प्रकाश गंगावणे (वय २५, रा.धोम कॉलनी वाई) अक्षय तानाजी सणस (वय २२, नागेवाडी, ता वाई) शुभम सिताराम डोलारे (२१, जनता वसाहत वाई )साई लादूराम सुतार (२५, रा.दत्तनगर कात्रज) हेमंत भाटे, दादा दळवी ,सतीश मारगजे आदींना पोलिसांनी अटक केली होती.या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या सर्वांच्या जमीन अर्जावर पुणे येथील शिवाजीनगर एम पी परदेशी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. या गुन्ह्यात अटक केलेल्या सर्व संशयितांना पुराव्याअभावी शिवाजीनगर न्यायालयाने जामीन दिला. 

Related Stories

सातारा : बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा

Shankar_P

वाईतील राज्यस्तरीय गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

अल्पवयीन युवतीच्या विनयभंगप्रकरणात चार जणांवर पोक्सो

Patil_p

सहा बाधितांनी कराड हादरले

Patil_p

सह्याद्री हॉस्पीटलमधील सहा जण झाले कोरोना मुक्त

triratna

स्थानिक भूमिपुत्रांसह पुणे, मुंबईवरून आलेल्यांना रोजगाराची सुवर्णसंधी

Patil_p
error: Content is protected !!