तरुण भारत

‘आप’ने फिरवला झाडू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्ली महानगरपालिकेच्या पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने 4 तर काँग्रेसने 1 जागा मिळवत आपले खाते उघडले. भाजपचा मात्र या पोटनिवडणुकीत पराभव झाला.

28 फेब्रुवारीला दिल्ली महानगरपालिकेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीसाठी 50 टक्के मतदान झाले होते. त्याचे निकाल आज हाती आले. त्रिलोकपुरी, शालीमार बाग वॉर्ड, रोहिणी-सी आणि कल्याणपुरी प्रभागात आपचे उमेदवार विजयी झाले. तर पूर्व दिल्लीच्या चौहान बांगड मतदारसंघात काँग्रेसने जागा मिळवली. 

त्रिलोकपुरीत आपचे विजयकुमार 4986 मतांनी, शालीमार बाग प्रभागात सुनिता मिश्रा यांचा 2705, रोहिणी-सी मतदारसंघात रामचंद्र 2985 तर कल्याणपुरीत धीरेंद्र कुमार 7403 मतांनी विजयी झाले. तर पूर्व दिल्लीच्या चौहान बांगड मतदारसंघात झुबीर अहमद यांनी 10,342 मतांनी विजयी मिळवला.

Related Stories

परदेशी लसींना भारताचे दरवाजे बंद?

datta jadhav

आझम खान यांना मोठा झटका

Patil_p

देशात ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण पोहोचले 4 लाखांच्या पार

Patil_p

जयपूरमध्ये समूह संसर्गाचा धोका

Patil_p

जम्मू काश्मीर : श्रीनगरच्या लारापोआमध्ये दहशतवादी हल्ला

pradnya p

जगप्रसिद्ध फोर्ब्सच्या यादीत ऍड. युवराज नरवणकर

triratna
error: Content is protected !!