तरुण भारत

आरोग्य केंद्रांचे होणार ‘फायर ऑडिट’

 जि. प. चा निर्णय : जिल्हा नियोजन समितीकडे 25 लाखाची मागणी

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

Advertisements

भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत आता सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे 25 लाखाच्या निधीची मागणी केली आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने याची गंभीर दखल घेत जुन्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनीही जिल्हय़ातील सर्व जुन्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार काही विभागांनी आपापल्या विभागातील जुन्या इमारतीचे फायर ऑडिट करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

जिल्हय़ात 38 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून काही आरोग्य केंद्रांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. तसेच उपकेंद्राच्याही काही इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे तातडीने फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी 25 लाखाचा निधी देण्याची मागणी जि. प. प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे.

Related Stories

नियम मोडल्यास दुकाने सील

NIKHIL_N

कर्नाटक : माजी मुख्यमंत्री गुंडू राव यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन

Abhijeet Shinde

कर्नाटकात येताना केरळमधील नागरिकांकडे कोरोना नकारात्मक अहवाल असणे आवश्यक

Abhijeet Shinde

हिवाळे आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

NIKHIL_N

तेंडोली येथील डंपर व्यावसायिकाची आत्महत्या

NIKHIL_N

कर्नाटक : कल्याण उत्सवाला मुख्यमंत्रीची हजेरी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!