तरुण भारत

सुमित नागल मुख्य ड्रॉमध्ये

वृत्तसंस्था/ ब्युनॉस एअर्स

भारताच्या सुमित नागलने वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या निकोलास किकरचा पात्र फेरीच्या अंतिम सामन्यात पराभव करून अर्जेन्टिना ओपन रेड क्ले स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले.

Advertisements

मुख्य स्पर्धेत नागलची सलामीची लढत जागतिक क्रमवारी 100 व्या स्थानावर असणाऱया पोर्तुगालच्या जोआव सौसाशी होणार आहे. नागलने किकरचा 2-6, 6-2, 6-3 असा पराभव केला होता. त्याआधी त्याने स्पेनच्या कार्लोस गोमेज हेरेरा व मारिओ व्हिलेला मार्टिनेझ यांचा पराभव केला होता.

कझाकमधील नूर सुल्तान येथील एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या पी. गुणेश्वरन व रामकुमार रामनाथन यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवित दुसऱया फेरीत स्थान मिळविले. गुणेश्वरनने जर्मनीच्या ज्युलियन लेन्झचा तर रामकुमारने फ्रान्सच्या हय़ुगो ग्रेनियरचा पराभव केला.

Related Stories

जर्मनीचा लॅटव्हियावर मोठा विजय

Patil_p

चेल्सीचा मँचेस्टर सिटीला धक्का

Patil_p

भारतीय कसोटी संघाचा सराव सामना आजपासून

Patil_p

विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप फायनल पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणेच

Patil_p

ऍग्युरो बार्सिलोनाशी करारबद्ध

Amit Kulkarni

शिवा थापा, दीपक पुढील फेरीत दाखल

Patil_p
error: Content is protected !!