तरुण भारत

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर गीता माँची हजेरी!

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ हा कार्यक्रम आता निर्णायक वळणावर येऊन पोचला आहे. गेले अनेक आठवडे स्पर्धक आणि त्यांचे गुरू यांनी महाराष्ट्राला आपल्या नृत्याची चुणूक दाखवली आहे. आता या स्पर्धेत टॉप 5 स्पर्धक उरले आहेत. सेमीफिनाले च्या या कार्यक्रमात नृत्याच्या महागुरू गीता माँ येणार आहेत. गीता माँ गेली अनेक वर्षं नृत्यसृष्टीत कार्यरत असून त्यांच्याकडून कित्येक जणांनी नृत्य शिकलं आहे.

Advertisements

या आठवड्यात एक अनोखा नृत्याविष्कार ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर पाहायला मिळणार आहे. एका कारमध्ये अपेक्षा आणि आशुतोष यांनी संपूर्ण नृत्य सादर केलं आहे. हे पूर्ण नृत्य एका टेकमध्ये केलं असून यात कोणतंही संपादन केलेलं नाही. रियालिटी शोच्या मंचावर झालेलं हे असं पाहिलंच सादरीकरण आहे.

प्राची प्रजापती, दीपक हुलसुरे, अपेक्षा लोंढे, प्रथमेश माने आणि अदिती जाधव या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक जण जिंकणार आहे ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’चा चषक.

Related Stories

मिशेल मोरोनची लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री

Patil_p

चित्रपटगृहांमध्ये पुन्हा झळकला नटसम्राट

Patil_p

‘क्राईम पेट्रोल’ मधील लोकप्रिय अभिनेते शफीक अन्सारी यांचे निधन

Rohan_P

तुमच्या तोंडात साखर पडो

Patil_p

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला

Abhijeet Shinde

ब्रेक घेतल्यावर इंडस्ट्रीला पडला विसर

Patil_p
error: Content is protected !!