तरुण भारत

कर्नाटक: ‘घरी लस घेतली काय चुकलं ?’

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकचे कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी घरी कोविड -१९ लस दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. विरोधी पक्षाने सरकार आणि काँग्रेसने टीका केली आहे. दरम्यान मंत्री पाटील यांनी घरगुती लसीचा तुम्ही विचार करत असाल तर घरी लसीकरण करण्यात काय चुकलं असा प्रश्न केला आहे.

मंगळवारी पाटील व त्यांच्या पत्नीने नेमलेल्या रूग्णालयात जाण्याऐवजी त्यांच्या घरी जबरदस्तीने घरी लसीकरण केल्याने पाटील वादात सापडले. राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर, आरोग्य सचिव राजेश भुषण आणि इतरही म्हणाले की हे प्रमाणित प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. या संदर्भात चौकशीही केली जाईल, असे म्हंटले होते.

दरम्यान राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालिका अरुंधती यांनी हवेरीचे बाल आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद यांना याप्रकरणी नोटीस बजावली आहे. पाटील यांनी या विषयावर घेतलेली भूमिका वेगळी होती. स्वत: चा बचाव करीत कृषिमंत्र्यांनी असा युक्तिवाद केला की जर ते रुग्णालयात लस घेण्यासाठी गेले तर त्यांच्या भेटीमुळे लोकांना थांबावे लागेल. इथे मी लोकांसमवेत जाऊ शकतो आणि लस देखील घेऊ शकतो. यात काय चुकीचे आहे?” असा सवाल पाटील यांनी केला.

Advertisements

Related Stories

बारावी निकाल प्रसिद्धीला स्थगिती

Amit Kulkarni

कर्नाटक : सोमवारी बाधित रुग्णांच्या संख्येत घट

Abhijeet Shinde

कर्नाटक: होय, आम्ही आरएसएस आहोत, पंतप्रधान मोदीही आरएसएसचे : मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

आरोग्य खात्यातील कंत्राटी कर्मचाऱयांच्या मागण्यांची दखल

Patil_p

माजी महापौर संपतराज यांना जामीन

Amit Kulkarni

‘त्या’ दोन महिला आयएएस अधिकाऱयांची उचलबांगडी

Amit Kulkarni
error: Content is protected !!