तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 28 रूग्ण, 14 कोरोनामुक्त

सक्रीय रूग्णसंख्या 381, तिसऱया दिवशीही कोरोना मृत्यू निरंक

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाचे 28 रूग्ण दिसून आले तर 14 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 381 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सलग तिसऱया दिवशी कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना बळी निरंक राहिल्याने बळींची संख्या 1745 झाली आहे. दिवसभरात 14 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 455 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 2, भुदरगड 2, चंदगड 0, गडहिंग्लज 2, गगनबावडा 0, हातकणंगले 2, कागल 0, करवीर 2, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 2, कोल्हापूर शहरात 13 तर अन्य 2 जणांचा समावेश आहे.

शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर, सीबीएनएएटी लॅबमधून गुरूवारी आलेल्या 192 अहवालापैकी 159 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 120 अहवाल आले. त्यातील 98 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टिंगच्या 267 रिपोर्टपैकी 252 निगेटीव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 50 हजार 581 आहेत. त्यापैकी 48 हजार 455 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिह्यात एकूण 381 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.

कोरोना रूग्ण 28 ः एकूण ः 50581
कोरोनामुक्त 14 ः एकूण ः 48455
कोरोना मृत्यू ः0 एकूण मृत्यू ः 1745
सक्रीय रूग्ण ः 381

Related Stories

गिर्यारोहक सागर नलवडे “ब्रॅन्ड कोल्हापूर” पुरस्काराने सन्मानित

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठासमोरील रस्त्यावर साकारतोय सायकल ट्रॅक

Abhijeet Shinde

विदर्भातील निवडणुकीसाठी सतेज पाटील `स्टार प्रचारक’

Abhijeet Shinde

कोल्हापुरात मंगळवारच्या 39 पॉझिटिव्हने रुग्णसंख्या 83 वरून 122 वर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘हेल्पर्स’मधील वादामागे ‘अर्थ’‘कारण’!

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शिरोळ पंचायत समिती सभापती निवड सहा ऑगस्टला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!