तरुण भारत

लोटेतील श्री पुष्कर कंपनीत वायू गळती

चार कामगारांसह महिलेस बाधा : रिऍक्टरचे तापमान वाढून काच फुटली

वार्ताहर / लोटे

Advertisements

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील श्री पुष्कर पेट्रोकेमिकल कंपनीमध्ये गुरूवारी पहाटे 3 वाजता प्लॅन्टमधील रिऍक्टरचे तापमान वाढल्यामुळे ओलियम वायूची गळती झाली. यामुळे 4 कामगारांसह नजीकच्या चहाच्या टपरीवरील महिलेला वायूबाधा झाली. बाधितांना कंपनीच्या रूग्णवाहिकेतून साईकृपा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

 रात्रपाळीमध्ये प्लॅन्टमध्ये काम सुरू असताना अचानक रिऍक्टरचे तापमान वाढले. त्यामुळे पातळी बघण्यासाठी असलेली काच फुटून त्यातून ओलियम वायू बाहेर आल्याने ही घटना घडली. या बाबतची माहिती मिळताच ग्रामस्थांनी प्रवेशद्वारावर धाव घेतली. मात्र कंपनीतून एकही जबाबदार व्यक्ती माहिती देण्यास बाहेर न आल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी तेथेच काही काळ तळ ठोकला. मात्र कुणीच दाद न दिल्याने सारे माघारी परतले. मुंबईहून आलेल्या कंपनी व्यवस्थापकांनी सकाळी 9 वाजता शासकीय यंत्रणेसह पोलिसांना या बाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वायूबाधा झालेल्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले. दरम्यान, श्री पुष्कर कंपनीत झालेल्या वायू गळतीने परिसरात  खळबळ उडाली. वायू गळतीनंतर नजीकच्या रहिवाशांची पळापळ होऊन अनेकांनी सुरक्षितस्थळी आसरा घेतला.

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहादिनीच दुर्घटना 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहातील दिवस साजरा केला जात असताना याचदिवशी वायुगळतीची घटना घडल्याने वसाहतीतील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Related Stories

रत्नागिरीत दुकाने फोडणाऱया दोघा संशयितांना अटक

Patil_p

रत्नागिरीत बालरोगतज्ञांच्या टास्क फोर्ससह कोविड रूग्णालय सज्ज!

Patil_p

कुंभार्ली घाट पाच तास ठप्प!

Patil_p

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Patil_p

खुराक बनलेल्या तहसीलच्या नूतनीकरणाकडे दुर्लक्ष?

Patil_p

दापोलीत गरोदर महिलेसह तिघांना कोरोनाची लागण

Patil_p
error: Content is protected !!