तरुण भारत

अफगाणमध्ये दहशतवाद्यांकडून 3 महिला पत्रकारांची हत्या

भारतीय मालिकांचे तिघी करायच्या डबिंग

काबूल : अफगाणिस्तानात तीन महिला पत्रकारांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. तिघींचीही हत्या दोन विविध हल्ल्यांद्वारे करण्यात आली आहे. या महिला एनिकास टीव्ही वाहिनीसाठी काम करत होत्या. तिघीही प्रसिद्ध भारतीय नाटके आणि मालिकांचे अफगाणिस्तानातील स्थानिक भाषांमध्ये अनुवाद आणि डब करत होत्या, अशी माहिती वाहिनीचे संचालक जलमई लतिफी यांनी दिली आहे. जलालाबाद येथे सादिया आणि शहनाज या महिला पत्रकारांवर अज्ञात हल्लेखोराने गोळय़ा झाडल्या आहेत. दोघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱया घटनेत मुरसल हबीबीला गोळय़ा घालण्यात आल्या आहेत. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ती मलालाई मैवाड यांची 10 डिसेंबर 2020  रोजी त्यांच्या चालकासह हत्या करण्यात आली होती.

Advertisements

Related Stories

अमेरिकेच्या 4 प्रांतांमध्ये संकट

Patil_p

मालदीवचे माजी अध्यक्ष बॉम्बहल्ल्यात जखमी

Patil_p

बोको हरामचा अबू बक्र शेकाउ ठार इस्लामिक स्टेटने दिली पुष्टी

Patil_p

अफगाण दहशतवादी हल्ल्यात अनेक बालके ठार

Patil_p

पाकिस्तानात बजबजपुरी

tarunbharat

कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्यास पाकचा नकार

datta jadhav
error: Content is protected !!