तरुण भारत

ताजमहालमध्ये बाँम्ब ठेवल्याची खोटी धमकी, आरोपी ताब्यात

आग्रा : जगप्रसिद्ध ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगणारा फोन कॉल अखेर खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी शोधमोहिमेनंतर ही माहिती देत ताजमहालचा परिसर पर्यटकांसाठी पुन्हा खुला केला आहे. बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱया व्यक्तीची ओळख पटली असून त्याला फिरोजाबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ताजमहालमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देणारा फोन आल्यावर पोलिसांनी पर्यटकांना बाहेर काढून ताजमहालचे दोन्ही दरवाजे बंद केले होते. आग्रा पोलिसांच्या बॉम्बविरोधी पथकाने पूर्ण परिसराची तपासणी केली असता कुठलीच स्फोटके आढळली नव्हती. बॉम्ब ठेवल्याची माहिती देणाऱया व्यक्तीने 112 क्रमांकावर फोन केला होता. सैनिक भरतींमध्ये होत असलेल्या गैरव्यवहारांचा उल्लेख करत ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. ताजमहाल परिसरात प्रतिदिन सुमारे 5 हजार पर्यटन येत असतात. तेथे स्फोटके ठेवल्याची खोटी माहिती यापूर्वी अनेकदा मिळाली आहे. 2008 मध्येही असाच प्रकार घडला होता. तेव्हा एका व्यक्तीने धमकीवजा फोन केला होता. हा फोन दक्षिण भारतातून करण्यात आल्याचे समोर आले होते. या आरोपीला पोलिसांनी तामिळनाडूमधून अटक केली होती. पोलिसांना त्रास देण्यासाठी हे कृत्य केल्याचे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले होते.

Related Stories

अनन्याच्या बँक खात्याचीही चौकशी

Patil_p

राजस्थानमध्ये एका दिवसात तीन लोकांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 83 नवे रुग्ण

Omkar B

पंतप्रधानांकडून सरदारधाम भवनाचे उद्घाटन

Patil_p

आता जम्मू-काश्मीर अन् लडाखमध्येही खरेदी करता येणार जमीन

datta jadhav

BSF जवानांच्या गोळीबारात 2 बांग्लादेशी गो तस्कर ठार

datta jadhav

हिमाचलमध्ये खिचडी निर्मितीचा विक्रम

Patil_p
error: Content is protected !!