तरुण भारत

व्यापाऱयाची शोकांतिका, कर्जामुळे आत्महत्येचा प्रयत्न

कुटुंबातील सर्व 6 जणांकडून विषप्राशन

वृत्तसंस्था / वडोदरा

Advertisements

व्यापारात प्रचंड तोटा झाल्याने एका कुटुंबातील 6 जणांनी शीतपेयात कीटकनाशक मिसळवून जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. यातील 3 जणांचा मृत्यू झाला तर उर्वरित तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना गुजरातच्या वडोदरा येथील आहे. कुटुंबप्रमुखाचे सर्व काही विकले गेले होते. त्यांनी अखेरच्या काही दिवसांमध्ये पोट भरण्यासाठी स्वतःची मोपेड आणि त्यानंतर नातीची सायकल 500 रुपयांमध्ये विकली होती.

सर्व आशा विरून गेल्याने कुटुंबाने एकत्रितपणे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. जीव गमाविणाऱयांमध्ये नरेंद्र सोनी (68 वर्षे), त्यांचा 4 वर्षीय नातू पार्थ आणि 17 वर्षीय नात रिया सामील आहे. नरेंद्र यांची पत्नी दीप्ती, मुलगा भाविन आणि सून उर्वशीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कर्जाच्या दलदलीत कुटुंब नरेंद्र सोनी इमिटेशन ज्वेलरीचा व्यापार करत होते. काही वर्षांपासून व्यापारात त्यांना सातत्याने तोटा होऊ लागल्याने त्यांनी प्लास्टिकची सामग्री विकण्यास सुरुवात केली, तरीही तोटा झाल्यावर त्यांनी व्यापारात पूर्ण भांडवल गुंतविले. अखेरीस त्यांनी लाखो रुपयांचे कर्ज घेतले, त्याचे व्याज भरण्यासाठी त्यांना घरही विकावे लागले.

Related Stories

आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन यांची तुघलकाशी तुलना

Patil_p

बिहारमध्ये पुन्हा रालोआचेच सरकार

Patil_p

बिहारमध्ये व्यापक स्क्रीनिंग

Patil_p

कोरोना संसर्गापासून वुहान मुक्त

Patil_p

पुढील 12 तासात चक्रीवादळाचा धोका

datta jadhav

EC 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता

Sumit Tambekar
error: Content is protected !!