तरुण भारत

विदेशी कंपन्यांची डिजिटल बाजारासाठी चढाओढ

वृत्तसंस्था / मुंबई

भारताच्या डिजिटल रिटेल बाजारावर ताबा मिळवण्यासाठी आता विदेशी कंपन्यांची मोठी चढाओढ सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांपैकी फेसबुक, ऍमेझॉन आणि गुगलसह पेडिट कार्ड सेवा देणारी वीजा इंक व मास्टरकार्ड यासारख्या कंपन्या आता समोरा-समोर आल्या आहेत. सदरच्या कंपन्या या देशातील रिटेल पेमेंट्स आणि सेटलमेंट सिस्टम ऑपरेट करण्यासाठी परवाना मिळवण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

Advertisements

मार्चमध्ये 31 तारखेपर्यंत सदरचा प्रस्ताव दाखल करता येणार आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे. दुसऱया बाजूला डिजिटल पेमेंटला वेगाने तेजी मिळत असल्याचे संकेत आहेत. कारण भारतामध्ये 130 कोटी लोकांनी ऑनलाईन शॉपिंग आणि ऑनलाईन गेमिंग तसेच स्ट्रीमिंग यासारख्या सेवांनी तेजी घेण्यास सुरूवात केलेली आहे. भारतामध्ये वर्ष 2023 पर्यंत ऑनलाईन पेमेंटची उलाढाल 1 लाख कोटी डॉलर्स होण्याचा अंदाज क्रेडिट सुइस ग्रुपच्या अहवालामधून व्यक्त करण्यात आला आहे. कंपन्यांनी डिजिटल देवाण-घेवाणीला प्रोत्साहन देणारे उपाय आरंभले आहेत.

Related Stories

5 जी डाऊनलोडमध्ये सौदी अरेबिया अव्वल

Patil_p

विदेशी चलन साठा विक्रमी स्तरावर

Patil_p

‘अमुल’ची क्रमवारीत आठव्या स्थानी झेप

Patil_p

कार, मोटारसायकलच्या नंबरसाठी केंद्राची नवी योजना

Patil_p

वाहन क्षेत्र निराश !

Omkar B

‘आयटीसी’ला 3 हजार 816 कोटींचा नफा

Amit Kulkarni
error: Content is protected !!