तरुण भारत

पाकिस्तानकडे लस खरेदीसाठीही नाहीत पैसे

ऑनलाईन टीम  / इस्लामाबाद : 

कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी जगभरात कोरोना लसीकरणाला वेग आला आहे. मात्र, कर्जबाजारी पाकिस्तान लस खरेदीसाठी पैसे नसल्याने चीनसारख्या भागीदार देशांकडून मोफत मिळणाऱ्या लसीवर अवलंबून आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचे सचिव अशरफ ख्वाजा यांनी पब्लिक अकाउंट कमिटीच्या ब्रिफिंगदरम्यान यासंदर्भात माहिती दिली.

Advertisements

पाक सरकारने देशातील किमान 70 टक्के लोकांना मोफत लस देण्याची योजना आखली आहे. मात्र, हे लसीकरण आंतरराष्ट्रीय देणगीदार संस्था आणि चीनसारख्या भागीदार देशांकडून मोफत मिळणाऱ्या लसींमधून होणार आहे. पाकला यापूर्वीच चीनच्या सिनोफॉर्मकडून 5 लाख डोस मिळाले असून, अजून 5 लाख डोस मिळणार आहेत. ब्रिटनकडून  2 कोटी 80 लाख डोस मिळाले आहेत.

पाकिस्तानच्या औषध नियामक मंडळाने रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीच्या आपत्कालीन वापरासही परवानगी दिली आहे. मात्र, रशियाची ही लस पाकला कधीपर्यंत मिळणार याची माहिती अजूनही समोर आलेली नाही. 

Related Stories

इस्लामिक संघटनेत भारताचा व्हेटो

Patil_p

चीनच्या चार कंपन्यांकडून होणारी आयात अमेरिकेने रोखली

datta jadhav

गुजरातने केलं, महाराष्ट्र केव्हा करणार ‘म्यूकोरमाइकोसिस’च्या वायल खरेदी?

datta jadhav

कारमध्ये राहणाऱया शिक्षकाला अनमोल गुरुदक्षिणा

Patil_p

शोपियां चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

“तुम्ही निवृत्त व्हा नाहीतर मी तुमच्या विरोधात … “

Abhijeet Shinde
error: Content is protected !!