तरुण भारत

दापोलीत तृत्तीयपंथी असल्याचे भासवून चोरी, चार जण ताब्यात

19 ते 27 गटातील मुलांनी साडी नेसून केली चोरी

वार्ताहर / मौजेदापोली

दापोली तालुक्यातील वेळवी येथील एका दुकानात जावून चार जणांनी तृत्तीयपंथी असल्याचे भासवत चोरी केल्याचा प्रकार घडला. हे चोर तृत्तीयपंथी नसून ते पुरूष असल्याचे उघड झाले. या चार जणांना ताब्यात घेवून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

दापोली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वेळवी येथील उत्तम मोरे मूळ गाव वडशेत, ता. श्रीवर्धन यांच्या दुकानाजवळ एक राखाडी रंगाच्या नॅनोकार मधून चारजण आले. हे चारही जण साडी नेसले होते.

त्यानी उत्तम मोरे यांच्याकडे पाचशे रूपयाची भीक मागितली व त्या चारही व्यक्ती वाद घालू लागल्या व दरम्यान मोरे यांचे लक्ष चुकवून त्यातील एकाने मोरे यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरला. या नंतर ते हर्णैकडे गेल्याचे समजले म्हणून त्या चार जणांना शोध घेत मोरे तेथे आले. त्यावेळी पोलीस व हर्णै येथील नागरीकांच्या सहकार्याने त्यांना हर्णै येथे ताब्यात घेण्यात आले. यात रमेश मांडवकर वय 24, शिवरतन सोळंकी वय 25, जीवन मांडवकर वय 19, मोहन मांडवकर वय 27 मूळ गाव बुलढाणा सध्या राहणार माणगाव या चार जणांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधिकारी प्रमोद झगडे करत आहेत.

Related Stories

रेल्वेने येणाऱया चाकरमान्यांची होणार आरोग्य तपासणी

NIKHIL_N

संगमेश्वरच्या व्यापाऱयांसाठी भाजपचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार मैदानात

Patil_p

कोयना अवजल प्रकल्प ठरणार रिफायनरीची पूर्वतयारी?

Amit Kulkarni

गिरणी चालकांना मोठा फटका

NIKHIL_N

जिल्हय़ातील 30 उद्योगांना उत्पादनास परवानगी

Patil_p

जिल्हय़ात वीजबिलापोटी 71 कोटींची थकबाकी

NIKHIL_N
error: Content is protected !!