तरुण भारत

रामपूर येथे दुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू

जत / प्रतिनिधी

जत तालुक्यातील रामपूर येथील आनंद महादेव शिवशरण (वय 42) या कामगाराचा दुचाकीवरून तोल जाऊन दगडावर पडल्याने शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. हा अपघात रामपूर येथे शिवशरण यांच्या घराजवळ झाला. मयत आनंद शिवशरण हे जत एमआयडीसी येथे असणाऱ्या वारणा दूध संस्थेत कामाला आहेत. दुपारी ते कामावर जात असताना, त्यांची दुचाकी स्लीप झाली. ते गाडीवरून दगडावर आपटल्याने त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला. अति रक्तस्राव झाल्याने, त्यांना उपचारासाठी आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

Related Stories

उद्या सुपर फ्लावर मून छायाकल्प, ग्रहणात होणार महा चंद्रोदय – डॉ. शंकर शेलार

Abhijeet Shinde

राज्यातील सर्व रिक्षा संघटनांची पनवेलमध्ये दोन दिवस परिषद

Abhijeet Shinde

सांगली : बाल निरीक्षण गृहातून चार अल्पवयीन मुलांचे पलायन

Abhijeet Shinde

शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ….

Abhijeet Shinde

सांगली आयर्विन ब्रिज जवळ पाणी पातळीत सहा इंचाने घट

Abhijeet Shinde

सांगली : प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करा निवडणूक; आयोगाच्या प्रशासनाला सूचना

Sumit Tambekar
error: Content is protected !!