तरुण भारत

स्टेट बँकच्या योनो ऍपवर मिळणार विशेष ऑफर

नवी दिल्ली

 देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)कडून पुन्हा एकदा योनो ऍपवरुन शॉपिंग करण्यावर कॅशबॅक सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सदरची सवलत ही गुरुवारी म्हणजे 4 मार्च रोजी सुरु होणार असून ती 7 मार्चपर्यंत राहणार असल्याची माहिती बँकेने दिली आहे. परंतु सदर सुविधा वापरण्यासाठी ग्राहकांना नियम व अटीचे पालन करावे लागणार असल्याचे बँकेने स्पष्ट पेले आहे.

Advertisements

स्टेट बँकेने ट्विटरवर या संदर्भात अधिकची माहिती दिली आहे. निवडक कालावधीसाठी असणाऱया या सवलत योजनेमुळे योनो ऍपवरुन पेमेंट करण्यासाठी बंपर सवलत मिळणार असल्याची माहिती आहे. ही सुविधा ऍमेझॉन, अपोलो, इएमटी, ओयो, रेमंड आणि वेदांतूच्या पेमेंट स्टेट बँक योनोच्या मदतीने भरपूर पैसे वाचविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

योनोचे सादरीकरण 2017 मध्ये

स्टेट बँकेने डिजिटल बँकिंग ऍप म्हणून योनो ऍपचे लाँचिंग केले आहे. सदरचे ऍप हे 24 नोव्हेंबर 2017 रोजी सादर केले होते. योनो, बँकिंग, लाईफस्टाईल, विमा, गुंतवणूक आणि खरेदीसाठी आवश्यक असणाऱया सर्व पर्यायांची उपलब्धता यामध्ये असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

Related Stories

बायजूसकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध

Patil_p

ऍपलचा 15 इंचाचा आयपॅड येणार

Patil_p

हार्ले डेव्हिडसन गाशा गुंडाळणार

Patil_p

हेक्सागॉन न्युट्रीशनचा येणार आयपीओ

Patil_p

महिंद्राच्या कार मिळत आहेत सवलतीत

Patil_p

आयकीयाचे शॉपिंग ऍप लाँच

Amit Kulkarni
error: Content is protected !!