22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

गावसकरांचे असेही ‘अर्धशतक’…आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सुवर्णमहोत्सव!

मुंबई / वृत्तसंस्था

50 वर्षांपूर्वी, याच दिवशी म्हणजे दि. 6 मार्च 1971 रोजी सुनील गावसकर यांच्यासारखा तारा भारतीय क्रिकेटला लाभला आणि या जुन्या आठवणींना उजाळा देताना गावसकर हळवे झाले नसते तरच नवल होते! आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण सुवर्णमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला गावसकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, जर चाहते मला अमिताभ बच्चन आणि किशोर कुमार यांच्या पंगतीत दाखल करत असतील तर तो मी माझा सन्मानच मानतो!

अमिताभ बच्चन यांच्या जंजीर, दीवार, शोले, त्रिशूल या चित्रपटांनी सत्तरीचे दशक गाजवले, त्याचप्रमाणे किशोर कुमार यांच्या अफलातून गायकीने देखील सत्तरीच्या दशकापासूनच चाहत्यांच्या मनात घर केले. योगायोगाने सुनील गावसकरांचा सुवर्णकाळ देखील त्याच दशकातील राहिला. त्या पार्श्वभूमीवर गावसकर बोलत होते.

1971 मध्ये विंडीजविरुद्ध पदार्पणाच्या त्या मालिकेत गावसकरांनी 774 धावांची आतषबाजी केली आणि हेल्मेट न घालता फलंदाजी करणाऱया या अव्वल फलंदाजाची कारकीर्द नंतर बहरतच गेली. 1974 मध्ये अजित वाडेकर व दिलीप सरदेसाई निवृत्त होईतोवर आपल्यावर कधीच दडपण नव्हते, या आठवणीला गावसकरांनी आवर्जून उल्लेख केला. पदार्पणाच्या मालिकेत 774 ऐवजी अगदी 400 धावांच्या आसपास पोहोचता आले असते तरी मी खुश झालो असतो, असे ते विंडीजच्या जलद ताफ्याची प्रशंसा करताना म्हणाले. आपल्या 17 वर्षांच्या धडाकेबाज कारकिर्दीत गावसकरांनी एकदाही हेल्मेट घातले नाही. कारण, बाऊन्सर हे आक्रमक फटके लगावण्यासाठी नामी संधीच आहे, असे ते मानायचे.

प्रा. वशिष्ठ यांच्याकडून गावसकरांना खास मानवंदना

कालिकत ः येथील मलाबार ख्रिस्तियन महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रा. वशिष्ठ यांनी गावसकरांच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त खास पोस्टर तयार करत त्यांना अनोखी मानवंदना दिली. सुनील गावसकरांचे 1971 ते 1987 या कालावधीतील ऐतिहासिक पर्व भारतीय क्रिकेटसाठी व आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रा. वशिष्ठ यांनी नमूद केले आहे. गावसकर यांनी भारतीय क्रिकेटसाठी जे अमूल्य योगदान दिले, त्याचा गौरव करण्यासाठी आपण हा अनोखा उपक्रम राबवल्याचे प्रा. वशिष्ठ म्हणतात.

Related Stories

डेक्कन चार्जर्सला 4800 कोटी रुपये देण्याचा बीसीसीआयला आदेश

Patil_p

एटीपी चषक स्पर्धेसाठी निक किर्गीओसला संघातून डच्चू

Patil_p

भारत-चिली महिला हॉकी सामना बरोबरीत

Patil_p

राजस्थान-हैद्राबाद आज चुरशीचा सामना

Patil_p

19 सप्टेंबरपासून फुटणार आयपीएलचे फटाके!

Patil_p

ओसाका, रॉजर्स, ब्रॅडी उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p
error: Content is protected !!