तरुण भारत

महाराष्ट्र केसरीच्या आखाडय़ात मनोज कदम, ऋषिकेश देशमुख

मुंबई आणि रायगड मधून माती गटात निवड

 वार्ताहर/ औंध

राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी खटाव तालुक्यातील आणखी दोन मल्लांची माती गटातून निवड झाली आहे. 

 नांदोशी (ता. खटाव) येथील मनोज आण्णा कदम 92 किलो वजनगटातून मुंबई उपगरचे प्रतिनिधित्व करणार आहे. तो भोसले व्यायामशाळा सांगली येथे प्रशिक्षक संभाजी सावर्डेकर, शहाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तसेच जायगांव (ता. खटाव) येथील ऋषिकेश दिलीप देशमुख रायगड जिह्यातून  97 किलो गटात आखाडय़ात उतरणार आहे. तो भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोली येथे मारुती आडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. निवड झालेल्या मल्लांचे कुस्तीशौकिनी कौतुक केले आहे.

Related Stories

सद्भावना दौडचे कराडमध्ये स्वागत

Amit Kulkarni

शहरात किरकोळ विक्रेत्यांनी मांडला थाट

Patil_p

कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 31 मार्चपर्यंत ‘एसओपी’ लागू करणार : अजित पवार

pradnya p

मिरजेत एकाच दिवशी कोरोना रुग्णांची सेंच्युरी

Shankar_P

दरोडय़ाच्या तयारीतील संशयित जेरबंद

Patil_p

सातारा, कराडमध्ये पूर्णपणे सन्नाटा

Patil_p
error: Content is protected !!