तरुण भारत

रत्नागिरी राधाकृष्णनगर येथे भंगार गोडावूनला आग

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरालगतच्या राधाकृष्णनगर येथे शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भगार गोडावूनला भीषण आग लागल़ी नगरपरिषदेच्या बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात आल़ी या आगीमध्ये मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असले तरीही सुदैवाने कोणीही जखमी झाले नाह़ी

Advertisements

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राधाकृष्णनगर येथे रहिवासी भागात असलेल्या गोडावूनला आग लागल्याने एकच गोंधळ उडाल़ा आगीचे लोळ जोराने पसरू लागल्यामुळे नजीकच्या इमारतीं व घरांना धोका निर्माण झाला होत़ा आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेचे बंब घटनास्थळी दाखल झाल़े आगीचे स्वरूप भयावह झाल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांना मोठी कसरत करावी लागल़ी 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आल़े

आगीमध्ये गोडावूनमधील भंगाराचे सामान खाक झाले आह़े सुदैवाने आगीमध्ये कुणीही जखमी झाले नाह़ी आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाह़ी या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरु आह़े

Related Stories

दुचाकी दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

Patil_p

रत्नागिरीमध्ये पांढरा कावळा ठरतोय कुतूहलाचा विषय

triratna

राष्ट्र सेवा दल मदत अन् संवाद

NIKHIL_N

चिपळुणात सांस्कृतिक केंद्रावर वृक्ष कोसळला!

Patil_p

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानेच वॉटरस्पोर्टस् बंद करू

NIKHIL_N

रत्नागिरी : संगमेश्वर जवळ कार अपघात, महिला जखमी

triratna
error: Content is protected !!