तरुण भारत

सिद्धु केरकर, हर्षदा शेटगावकर यांना ‘गोमंत समाजसेविका’ पुरस्कार

कला निकेतनचे पुरस्कार जाहीर : आज पणजीत संस्थेच्या वर्धापनदिन सोहळय़ात वितरण

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

ताळगाव येथील कला निकेतन सांस्कृतिक मंडळातर्फे देण्यात येणारे यंदाचे राज्यस्तरीय ‘गोमंत समाजसेविका’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

चिंचोळे ताळगाव येथील विमल उर्फ हषर्दा शेटगावकर(निवृत्त अंगणवाडीसेविका) यांनी 30 वर्षे निःस्वार्थीपणे सामाजिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भाजपच्या उत्तर गोवा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सिद्धी राजेश केरकर करभाट ताळगाव यांना कलानिकेतनचा राज्यस्तरीय ‘गोमंतकीय समाजसेविका’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. सन्मानपत्र व आर्कषक स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरुप आहे.

गोमंतकीय साहित्यिक तथा पद्मश्री विजेते विनायक विष्णू खेडेकर यांच्या हस्ते त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, तरुण भारतचे संपादकीय विभाग प्रमुख राजू नाईक, इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, नाटय़कर्मी अशोक काणकोणकर यावेळी उपस्थित राहातील. संस्थेच्या 7व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार दि. 6 रोजी सायं. 4 वा. पणजी येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात होणाऱया कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शेखर खांडेपारकर यांनी केले आहे.

Related Stories

कुळे शिगाव पूरग्रस्त भागाची मंत्री दीपक पाऊसकरांकडून पाहणी

Amit Kulkarni

अळंब्यासारखे उमेदवार स्वतःच भाजप उमेदवारीची घोषणा करतात

Amit Kulkarni

कारापूरच्या प्रभाग 2 मध्ये अजास खान विजयी.

Amit Kulkarni

एलआयसीकडून कॅन्सर संस्थेला मोबाईल व्हॅन प्रदान

Amit Kulkarni

सरकारचे संवेदनशील विषयांकडे दुर्लक्ष

Patil_p

आजही मुसळधार पाऊस

Amit Kulkarni
error: Content is protected !!