प्रतिनिधी / पणजी
महिला दिनानिमित्त गोवा वुमनियातर्फे दि. 7 रोजी दुपारी 3.30 वा. काकुलो मॉल येथे गो वुमनिया अचिव्हर्स पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021 या दरम्यान उत्तमरित्या कौशल्य दाखविलेल्या महिला उद्योजकांना ओळखून त्यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. राज्यातील ऑनलाईन फेसबुक कम्युनिटीमध्ये सहभागी असलेल्या सुमारे 11,500 महिला उद्योजकांचा यात समावेश असेल. सदर कार्यक्रम सर्व सोशल मीडीया व्यासपीठावर ऑनलाईन पद्धतीने दाखविण्यात येणार आहे.
लॉकडाऊन काळात महिलांनी उत्तमरित्या कार्य केलेल्याचे प्रदर्शन करून यातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. गो वुमनिया गोवा 2017मध्ये सिया रफिक शेख यांनी फेसबुक कस्थापित करण्यात आले होते. हस्तकलेच्या माध्यमातून एक विशिष्ट कम्युनिटी त्यांनी निर्माण केली होती. आर्थिक स्वातंत्र्य महिलांना मिळावे या विचाराने वस्तू तयार करून त्या विकून एक ग्रुप सिया यांनी तयार केला होता. सध्या 11,500 ग्रुप आयडी असून वेबएन आणि गोयंकार्ट एलएलपी प्रा. लि. असे दोन संस्था कार्यरत आहेत. वेबएन या कम्युनिटीतून व्यवसाय वाढीवतेसाठी प्रोत्साहन दिले जाते. याशिवाय रोज विक्रीवर लक्ष दिले जाते. गो वुमनिया ही ऑनलाईन कम्युनिटी आहे. मागील चार वर्षात इको प्रेंडली, हँडमेड व इतर गोंमतकीय वस्तूंची विक्री करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ ठरले आहे. या संस्थेमुळे महिला उद्योजकांना मार्गदर्शक मिळाला आहे. स्तनकर्करोग जागृती, मानसिक आरोग्य, वस्तू व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, आदी सत्रे कम्युनिटीतील सदस्यांसाठी आयोजित करण्यात आली आहेत. गोयंकार्ट ऍपचे उद्घाटन झाल्यापासून महिला उद्योजकांना नवीन प्रोत्साहन मिळाले आहे. या महिला ऍपद्वारे आपल्या वस्तूंची विक्री करतात. मागील चार वर्षात गो वुमनिया, वेबएन आणि गोयंकार्ट यांनी गोमंतकीय महिलांवर एक वेगळी छाप पाडली आहे. या संस्थेच्या संस्थापक सिया यांनी सिव्हिल इंजिनियर म्हणून सुरूवात केली आणि त्यानंतर करिअरसाठी पुणे येथे स्थायिक झाल्या. सिया या सामाजिक उद्योजिका असून ज्यांनी गोमंतकीय महिला उद्योजकांवर उत्तम छाप पाडली आहे.