तरुण भारत

हणजूण, शिवोलीत 20.5 लाखाचे ड्रग्स जप्त

आनंद गडेकर, मोहम्मद फजलला अटक : सीआयडी पाठोपाठ एएनसी सरसावली

प्रतिनिधी / पणजी

अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पोलिसांनी (एएनसी) हणजूण व शिवोली येथे केलेल्या कारवाईत तब्बल 20 लाख 50 हजार रुपये किमंतीचे ड्रग्स जप्त केले आहे. या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली असून संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

अटक केलेल्या संशयितांमध्ये आनंद गडेकर व मोहम्मद फजल उसमान यांचा समावेश आहे. गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल 10 लाख रुपये किमंतीचा गांजा जप्त केल्यानंतर राज्यातील ड्रग्स विरोधी मोहिमेत एएनसी पोलीसही सरसावले आहेत. गेल्या दोन दिवसात दोन ठिकाणी केलेल्या या कारवायांत मोठय़ाप्रमाणात एलएसडी, गांजा, चरस जप्त केला आहे.

शिवोलीत 19 लाखांचे ड्रग्ज जप्त

ओशेल शिवोली येथे केलेल्या कारवाईत 19 लाख रुपये किमंतीचा ड्रग्स जप्त करून मोहम्मद फजल या संशयिताला अटक केली आहे. संशयित परप्रांतीय असून ड्रग्स विक्री करण्यासाठी तो अधूनमधून गोव्यात येत असतो. यावेळी संशयित ड्रग्स विक्री करण्यासाठी गोव्यात आल्याची माहिती एएनसी पोलिसांना मिळाली होती. संशयित गोव्यात आल्यानंतर शिवोली ओशेल येथील एका भाडय़ाच्या खोलीत राहिला होता.

रंगेहात पकडले मोहम्मद फजलला

पोलिसानी बनावट ग्राहक तयार करून संशयितांकडे पाठविले होते. बनावट ग्राहकाला ड्रग्स देत असतानाच संशयिताला रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याकडून 3.125 एलएसडी लिक्वीड, 314 एलएसडी पेपर जप्त केले आहेत. संशयिताला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हणजूणेत दीड लाखाचे ड्रग्ज जप्त

हणजूण येथे केलेल्या कारवाईत आनंद गडेकर या स्थानिक संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून चरस व गांजा मिळून सुमारे दीड लाख रुपये किमंतीचे ड्रग्स जप्त केले आहेत. एएनसीचे निरीक्षक सुरज हळर्णकर, सिताकांत नायक, उपनिरीक्षक रोहन मडगावकर, प्रितेश मडगावकर, अरुण देसाई व त्यांच्या टीमने दोन्ही कारवाया केल्या आहेत. एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

नानोडा येथील वैशिष्टय़पूर्ण घोडेमोडणी आज

Amit Kulkarni

वाळपई नवोदय विद्यालयातील 15 विद्यार्थी अडकले दिल्लीत

Omkar B

काणकोणला मुसळधार पाऊस, वादळी वाऱयाचा जोरदार तडाखा

Omkar B

बालभवनच्या 250 कंत्राटी कामगारांना वेतन मिळणे बाकी

Omkar B

पंतप्रधानांकडून श्रीपाद नाईक यांची फोनवरुन विचारपूस

Amit Kulkarni

..साळगाव कचरा प्रकल्पांमुळे जनता घेत आहे मोकळा श्वास

Omkar B
error: Content is protected !!