22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

शांतीसागर मुनींच्या स्मारकाचे लोकार्पण

प्रतिनिधी /बेळगाव

दक्षिण भारत जैन सभा माणिकबाग दिगंबर जैन बोर्डिंग बेळगाव येथे जैन धर्माचे प्रमुख शांतीसागर मुनी यांच्या स्मारकाचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले. जुना धारवाड रोड येथील माणिकबाग परिसरात हे स्मारक उभारले आहे.

दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, कर्नाटक जैन सभेचे अध्यक्ष आचार्य वर्धमान सागर, भरतेश शिक्षण संस्थेचे सचिव राजीव दोड्डण्णावर, राजेंद्र कटारिया, माजी आमदार संजय पाटील यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

जैन सोसायटी ही उत्तर व दक्षिण भारत अशा दोन विभागांमध्ये विभागली गेली आहे. जैन समाज उत्तर व दक्षिण भारतात पसरला आहे. या दोन्ही विभागाला या स्मारकामुळे एकत्रित आणण्याचे काम यापुढील काळात होईल, असे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला जैन समाजातील व्यक्ती मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

Related Stories

खानापूर नगराध्यक्ष निवड बिनविरोध होणार

Patil_p

लॉकडाऊन काळात शहराच्या प्रदूषणात 36 टक्क्मयांनी घट

Patil_p

जि.पं.च्या निधीत कोणाचाही हस्तक्षेप नको

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटी अनगोळ माळ सोसायटीमध्ये ग्राहक मेळावा-वाढदिवस

Amit Kulkarni

रताळय़ांचा लिलाव न करताच आपसात विक्री

Patil_p

बिम्स डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे आमच्या मुलीचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!