तरुण भारत

कोरोनामुळे परिवहनला 4,000 कोटींचा फटका

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची माहिती

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

राज्यात कोरोना परिस्थितीमुळे परिवहन महामंडळाच्या चार परिवहन निगमना 4,000 कोटी रुपयांहून अधिक फटका बसला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी विधानसभेत दिली. सुमारे 2,980 कोटी रुपये उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाला मोठा फटका बसला आहे, असे ते म्हणाले.

शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तर चर्चेवेळी निजदचे सदस्य के. टी. श्रीकंठेगौडा यांच्या प्रश्नावर सवदी यांनी उत्तर दिले. परिवहन महामंडळाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अर्थसंकल्पात खात्याला अधिक अनुदान देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या आर्थिक परिस्थितीला अनुसरून अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे. अनुदान मिळाल्यानंतर नुकसान भरून काढण्यास मदत होईल, असे मंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले.

राज्यातील विविध भागातील आमदारांनी नव्या बस खरेदी, नवे बसस्थानक निर्माण यासह विविध मागण्या आपल्याकडे केल्या आहेत. मात्र, या मागण्या कोरोना परिस्थितीमुळे पूर्ण करणे शक्य झालेले नाही. अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर मागण्या पूर्ण करणे शक्य होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Stories

राज्यात पहिल्या टप्प्यात 1.17 लाख उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीबंद

Patil_p

कर्नाटक : राज्यात शनिवारी ५३१ नवीन बाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

बेंगळूर विमानतळावर कोटीचे सोने जप्त

Patil_p

कर्नाटक पोटनिवडणूक:भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली

Abhijeet Shinde

७० टक्के शालेय फी भरण्याचा निर्णय मागे नाही : शिक्षणमंत्री

Abhijeet Shinde

शुक्रवारी 2,290 बाधितांची नोंद

Amit Kulkarni
error: Content is protected !!