तरुण भारत

मल्लिकार्जुन कलादगी यांच्याकडे खानापूरचीही जबाबदारी

प्रभारी कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती : विकासाला गती मिळण्याची आशा

प्रतिनिधी / बेळगाव

तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्या बदलीची चर्चा जोरदार सुरू असताना आता त्यांच्याकडे अतिरिक्त तालुक्मयाचा भार सोपविण्यात आला आहे. खानापूर तालुक्मयातील प्रभारी कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता खानापूर तालुक्मयाचाही भार त्यांच्यावर पडला आहे.

खानापूर येथील कार्यकारी अधिकारी बी. व्ही. अडवीमठ यांची बढतीवर बदली झाली आहे. अडवीमठ हे बळ्ळारी जिल्हा पंचायतमध्ये उपकार्यनिर्देशक म्हणून रुजू झाले आहेत. त्यामुळे खानापूर येथील कार्यकारी अधिकारी पद रिक्त होते. सरकारने याबाबत कलादगी यांना खानापूर तालुका पंचायतीला प्रभारी कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

बेळगाव तालुक्मयातील अनेक विकास कामांना त्यांनी चालना दिली आहे. काही अनधिकृत कामे न केल्यामुळे काहींनी त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न केले. त्यांची बदलीही झाली. मात्र त्यांनी न्यायालयात जाऊन या बदलीवर स्थगिती मिळविली आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण न होतानाही बदली करण्यात आल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला होता. कलादगी यांच्या बदलीचे राजकारण तापले असतानाच सरकारने आता त्यांच्यावर खानापूर तालुका पंचायतीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता खानापूर तालुक्मयातील विकासासाठी ते प्रयत्नशील असून तेथील विकास कामांना कोणत्या प्रकारे गती देणार, याकडे खानापूरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

रायगड येथील सुवर्ण सिंहासनासाठी 5001 चा धनादेश सुपूर्द

Amit Kulkarni

पाटीलगल्लीतील गळतीकडे पाणीपुरवठा मंडळाचा कानाडोळा

Amit Kulkarni

जि. पं. क्षेत्रामध्ये खरेदी केंद्र सुरू करा

Patil_p

शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत आज बेळगावमध्ये

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात कोरोना बाधितांची शंभरी पार

Rohan_P

बागलकोट जिल्हय़ात आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!