बेळगाव : केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजीच्या एम.बी.ए. विभागाच्या वतीने दोन दिवसीय निवासी शिबिराचे दांडेली येथे आयोजन करण्यात आले होते. एम.बी.ए. च्या प्रथम सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच सांघीक कौशल्य, संभाषण कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन अशी कौशल्ये वाढण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी साहसी खेळांसोबतच जंगल सफरीचा आनंद लुटला. वॉटर रॅपलिंग, बाईक टेल, जंपिंग असे विविध खेळ विद्यार्थ्यांनी खेळले. एम. बी. ए. विभागाचे प्रमुख डॉ. डी. जी. कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढीला लागून समाजामध्ये वावरताना कसे वागले पाहिजे या विषयी या उपक्रमाद्वारे त्यांना माहिती दिली जात आहे. प्राचार्य डॉ. बसवराज कटगेरी म्हणाले विद्यार्थ्यांनी शिक्षणा सोबतच इतर कौशल्ये आत्मसात करायला हवी असे त्यांनी सांगितले.


next post