तरुण भारत

शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ ऑनलाइन

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे प्रमुख पाहुणे

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ मंगळवार, ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत. तर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी भूषवणार आहेत. या दीक्षांत समारंभात ७७ हजार ३०० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप होणार आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यंदा पहिल्यांदाच विद्यार्थी संख्या जास्त आहे. दीक्षांत समारंभाची मिरवणूक, स्टेज ग्रंथदिंडी यासंदर्भात विद्यापीठ रशासनात चर्चा सुरू असून ,हा विषय अधिकार मंडळासमोर ठेवून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे . एम . फिल आणि पीएच. डी च्या स्नातकांना पदवी प्रमाणपत्र कशा पद्धतीने द्यायचे या संदर्भात चर्चा सुरू आहे. तसेच दोन गोल्ड मेडल, इतर महत्त्वाची पदके देण्यासंदर्भात निर्णय अधिकारी मंडळ येणार आहे. विद्यापीठात दीक्षान्त समारंभाचे जय्यत तयारी सुरू झाली आहे.

Related Stories

आजपर्यंत ६४ पोलीस होमक्वारंटाईन- डॉ. अभिनव देशमुख

triratna

कोल्हापूर : पदवीधर व शिक्षक मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 14 कोरोना रूग्ण

Shankar_P

चिपरी येथील शाळकरी मुलीस फूस लावून पळवले

triratna

वारणेच्या बंधारे दुरूस्तीसाठी दहा कोटींचा निधी : जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील

triratna

विवेकानंदचे माजी प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांचे निधन

triratna
error: Content is protected !!