तरुण भारत

कोल्हापूर शहर विकास आराखड्याला मिळाला अधिकारी

धनंजय खोत यांची नगररचनच्या उपसंचालकपदी पदोन्नतीवर नियुक्ती
कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकाऱ्याच्या सीईओपदीपदी संजयकुमार चव्हाण

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर शहर विकास आराखडा आणि कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाला असणारी पूर्णवेळ जबाबदार अधिकाऱयाची प्रतीक्षा संपली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या (विकास योजना, विशेष घटक) उपसंचालकपदी धनंजय खोत यांची पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे. तसेच नगररचना विभागाच्या उपसंचालकपदाबरोबरच क्षेत्र विकास प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) जबाबदारी संजयकुमार चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने शुक्रवारी राज्यातील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरील नियुक्त्यांचे आदेश काढले.

शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडीचे असणाऱया धनंजय खोत यांनी यापूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक म्हणून सेवा बजावली आहे. कोल्हापुरातून त्यांची बदली तीन वर्षांपूर्वी पुण्याला झाली होती. तेथे सहाय्यक संचालक आणि लवाद म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यानंतर आता ते पुन्हा कोल्हापूर महापालिकेच्या सेवेत रूजू होत आहेत. खोत यांची कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागाच्या उपसंचालकपदी पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे. कोल्हापूर शहराच्या विकास आराखडÎाच्या प्रमुखपदाचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे सीईओ शिवराज पाटील निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. प्रशांत गायकवाड यांच्यावर प्रभारी पदभार होता. पण विकास प्राधिकरणाला संजयकुमार चव्हाण यांच्या रूपाने सीईओ लाभला आहे. त्यांच्याकडे उपसंचालकपदाचीही सूत्रे राहणार आहेत. चव्हाण हे यवतमाळ जिल्हÎातील पुसद गावाचे आहेत. सध्या ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये सहाय्यक संचालकपदी कार्यरत होते. त्यांची कोल्हापूर पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे.

शहर विकास आराखड्याला गती मिळणार

कोल्हापूर शहराचा पहिला आराखडा 1977 मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर दुसरा विकास आराखडा 2000 मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्याची मुदत वीस वर्षे होती. ती गतवर्षी 2020 मध्ये संपली. त्यानंतर नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध नव्हता. एका अधिकाऱ्याकडे हंगामी जबाबदारी देण्यात आली होती. आता खोत यांच्या नियुक्तीने विकास आराखड्याच्या कामाला चालना मिळणार आहे.

खोत, चव्हाण लवकरच होणार रूजू

धनंजय खोत आणि संजयकुमार चव्हाण हे दोघे उपसंचालक दोन तीन दिवसांत पदाची सूत्रे घेणार आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी मंगळवारी ते कोल्हापुरात हजर होतील, अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली.

Related Stories

कोल्हापूर : इचलकरंजीच्या गुंड लाखे गँगमधील फरारी गुन्हेगाराला अटक

triratna

कोल्हापूर : भुदरगड काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी जयंती साधेपणाने

Shankar_P

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यावर श्वेतपत्रिका काढा

Shankar_P

सूर्याभोवतीच्या खळ्याचे कोल्हापुरात दर्शन

triratna

कसबा सांगाव येथे अतिक्रमण हटाव मोहिम सुरु, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

triratna

महास्वच्छता अभियानात एक टन कचरा,प्लॅस्टिक जमा

triratna
error: Content is protected !!