तरुण भारत

मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणीचे आवाहन

नवीन ओळखपत्र डिजिटल पद्दतीने डाउनलोड करता येईल

प्रतिनिधी / सातारा

मतदार नोंदणी अभियानांतर्गत ज्या नवीन मतदारांनी आपली मतदान नोंदणी केली आहे. अशा नवमतदारांना आपले डिजीटल निवडणूक ओळखपत्र स्वत: काढण्याची संधी उपलब्ध असून दि.6 ते 7 मार्च 2021 या दोन दिवशी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल व मतदार सहाय्यता अॅपद्वारा डिजीटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करता येणार आहे.

मतदार नोंदणी अधिकारी,262 सातारा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, सातारा यांच्या कार्यालयातून यासंदर्भात माहिती जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगातर्फ राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल व मतदार सहाय्यता ॲपवर ज्या मतदारांनी 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी केली आहे. ज्यांनी आपला मोबाईल क्रमांक नोंदविला आहे. अशा मतदारांना ई-इपिक डाऊनलोड करण्याची सुविधा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (एनव्हीएसपीडॉटइन) व मतदार सहाय्यता अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. दि.6 व 7 मार्च 2021 या दोन दिवशी सर्व मतदान नोंदणी अधिकारी सहाय्यक मतदार नॉदणी अधिकारी यांचे कार्यालय ई-इपिक झऊनलोड करण्याकरिता सुविधा व सहाय्य उपलब्ध करून देणार आहे.

उपरोक्त दिवशी व्यतीरिक्त अन्य दिवशी हे केंद्रीय स्तरावर मतदान अधिकारी संबंधित मतदाराशी संपर्क साधून मतदारानां ई-इपिक डाऊनलोड करण्यासंदर्भात सुविधा व सहाय्य उपलब्ध करून देणार आहेत. जानेवारी नंतर ज्यांनी मतदार म्हणून नवीन नोंदणी केली आहे त्यांना ही सुविधा घेता येणार आहे. असे उपविभागीय अधिकारी, उपविभाग सातारा. यांनी कळविले आहे.

Related Stories

कोयना धरण फुल्ल..!

triratna

सातारा नगरपालिकेत हाणामारी

triratna

सातारा : श्रेयसच्या भन्नाट कथेने उडाली बावधनकरांसह पोलिसांची ही तारांबळ

triratna

सातारा : अडचणीतल्या साखर उद्योगाला केंद्र सरकारचे धोरणच जबाबदार !

datta jadhav

सातारा जिल्ह्यात 925 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

triratna

शेतकऱयांचे पैसे बुडविणारे पदवीधरांचे प्रश्न काय सोडवणार?

Patil_p
error: Content is protected !!