तरुण भारत

वसगडेत गवा रेड्याचे दर्शन

वसगडे / वार्ताहर

पलूस तालुक्यातील वसगडे – खटाव सिमेवर महावीर पाटील यांच्या ऊसाच्या शेतात गवा रेडा बसल्याचे आढळुन आल्याने शेतकर्‍यांच्या मधुन घबराटीचे वातावरण पसरले आहे.

सध्या ऊसतोडीचा हंगाम जोमात सुरु असुन ऊसतोड कामगारा बरोबर शेतकर्‍यांची धांदल सुरु असताना गवा रेड्याचे दर्शन झाल्याने नागरिकामधुन अस्वस्थता पसरली आहे. या परीसरात दोन वर्षापुर्वी सुखवाडी मध्ये गवा रेडा दिसुन आला होता.
वनखात्याला याबाबत कळविण्यात आले असुन सायंकाळ पर्यंत तरी वनखात्याचे अधिकारी वसगडेत दाखल झाले नव्हते. गवा रेडा शक्यतो माणसांना हानी पोहचवत नाही मात्र काळजी घेण्याचे आवाहन वसगडेच्या निसर्ग फौंडेशनचे दिपक परीट यांनी सांगीतले आहे.

Related Stories

आनंदवार्ता : अवघे 126 रूग्ण वाढले

triratna

दहा कॅबिनेटमंत्र्याच्या बरोबरीचे काम करून दाखवू : ना. बच्चू कडू

triratna

भीमनगर, राजर्षी शाहू कॉलनी, नवीन वसाहत झोपडपट्ट्याना आयुक्तांची भेट

triratna

पलुस येथे ट्रॅक्टर दुचाकी धडकेत एकजण जागीच ठार

triratna

सांगली : 18 जणांचा मृत्यू, 293 रूग्ण वाढले

triratna

सांगली : पूर बाधित गावांसाठी पंधरा बोटी प्रदान

Shankar_P
error: Content is protected !!