तरुण भारत

पीव्ही सिंधूची जेतेपदाकडे वाटचाल

वृत्तसंस्था/ बॅसेल, स्वित्झर्लंड

ऑलिम्पिक रौप्यविजेत्या भारताच्या पीव्ही सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा पराभव करून स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवित जेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली आहे.

Advertisements

विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या सिंधूने चौथ्या मानांकित ब्लिचफेल्डचा 22-20, 21-10 असा 43 मिनिटांच्या खेळात पराभव केला. गेल्या जानेवारीत योनेक्स थायलंड ओपन स्पर्धेत सिंधूला पहिल्याच फेरीत ब्लिचफेल्डकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची परतफेडही सिंधूने या सामन्यात केली. याच ठिकाणी 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिंधूने जेतेपद पटकावले होते. त्यानंतर पहिल्यांदाच तिने एखाद्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात भारताच्या किदाम्बी श्रीकांतनेही पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. त्याने थायलंडच्या सहाव्या मानांकित कांताफोन वांगचारोनवर 21-19, 21-15 असा केवळ 44 मिनिटांत पराभव केला. याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये हाँगकाँग सुपर 500 स्पर्धेत श्रीकांतने शेवटची उपांत्य फेरी गाठली होती. त्याची पुढील लढत येथे अग्रमानांकन मिळालेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनशी होणार आहे. या दोघांतील ही 2019 इंडिया ओपन स्पध्sा&नंतर पहिल्यांदाच गाठ पडणार आहे.

पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असणाऱया व येथे दुसरे मानांकन मिळालेल्या भारताच्या सात्विकसाईराज रनकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनीही उपांत्य फेरी गाठली असून त्यांनी पाचव्या मानांकित आँग यू सिन व तेओ एई यी यांच्यावर 12-21, 21-19, 21-12 अशी मात केली. सात्विक-चिराग यांची पुढील लढत डेन्मार्कच्या किम ऍस्ट्रप-अँडर्स स्कारुप रासमुसेन या सहाव्या मानांकित जोडीशी होणार आहे.

Related Stories

मनोज दशरथनचा पलानीवर विजय

Patil_p

आयपीएल कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक

Patil_p

इंग्लंड संघात बटलर, लीचचे पुनरागमन

Patil_p

सेनादल-सौराष्ट्र यांची उपांत्य फेरीत धडक

Patil_p

थिएम अंतिम फेरीत, व्हेरेव्ह स्पर्धेबाहेर

Patil_p

शेवटच्या सामन्यात आयर्लंडचा रोमांचक विजय

Patil_p
error: Content is protected !!