तरुण भारत

मिथुन चक्रवर्ती निश्चित, गांगुलींबद्दल उत्सुकता

मिथुन चक्रवर्ती निश्चित, गांगुलींबद्दल उत्सुकता

वृत्तसंस्था / कोलकाता

Advertisements

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून राज्यात सत्तारुढ तृणमूल काँग्रेस आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप यांच्यात जोरदार चुरस दिसून येत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष चित्रपटसृष्टीतील कलाकार तसेच क्रीडापटूंना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्याची राजधानी कोलकात्यात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जंगी सभा होणार असून याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. कारण या सभेत दोन दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. याचदरम्यान भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती रविवारी पंतप्रधान मोदींच्या सभेला उपस्थित राहणार असल्याची पुष्टी दिली आहे.

मिथून यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते सभेला येणार आहेत असे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या सभेतील उपस्थिती तसेच भाजपप्रवेशासंबंधी अद्याप साशंकता आहे. प्रकृतीचे कारण देत गांगुलींनी राजकारणातील प्रवेश टाळल्याची चर्चा आहे. तृणमूल काँग्रेसशी असलेले सख्य भाजपप्रवेशाच्या आड येत असल्याची चर्चा आहे.

सरसंघचालकांची भेट

मागील महिन्यात मिथून यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच त्यांच्या भाजपप्रवेशाचा कयास व्यक्त होऊ लागला होता. तर मिथून यांनी मात्र यासंबंधी काहीही बोलणे प्रकर्षाने टाळले आहे.

Related Stories

कोरोनामुक्तांचे प्रमाण नव्या रूग्णांपेक्षा अधिक

Patil_p

आंध्र प्रदेश : ट्रक आणि ट्रॅक्टरच्या धडकेत सात जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी

pradnya p

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

Patil_p

पाकिस्तानला १० दिवसांत हरवू शकतो : मोदी

prashant_c

अभिनेत्री विजयालक्ष्मीचा आत्महत्येचा प्रयत्न

Patil_p

देशात 24 तासात 6088 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!