तरुण भारत

9 एप्रिलला आयपीएलची सुरुवात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

यावर्षी होणाऱया आयपीएल स्पर्धेची तारीख निश्चित करण्यात आली असून 9 एप्रिलला त्याची सुरुवात होणार आहे. भारत व इंग्लंड यांच्यातील मालिका संपल्यानंतर बारा दिवसांनी आयपीएलची सुरुवात होणार आहे, असे बीसीसीआयने शनिवारी सांगितले.

Advertisements

भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा व शेवटचा वनडे सामना 28 मार्च रोजी पुणे येथे होणार आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम लक्षात घेऊन आयपीएलचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. ‘आयपीएलची सुरुवात 9 एप्रिलला करण्याचा आम्ही तूर्तास निर्णय घेतला असून त्याची सांगता 30 मे रोजी होणार आहे,’ असे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ सूत्राने सांगितले. ‘पुढील आठवडय़ात आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार असून त्यात आयपीएलच्या तारखा व केंद्र यांना अंतिम मंजुरी दिली जाणार आहे,’ असेही या सूत्राने सांगितले.

कोरोनाची परिस्थिती लक्षात ठेवून यावेळी आयपीएलमधील सामने चेन्नई, कोलकाता, बेंगळूर, दिल्ली व अहमदाबाद या पाच ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईत सामने आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून मान्यता मिळावयाची आहे. पुढील काही आठवडय़ात विधानसभा निवडणुका होणार असल्याने चेन्नई व कोलकाता या केंद्रांना सामने देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Related Stories

बुमराह म्हणतो, मी फक्त माझी जबाबदारी पार पाडतो!

Patil_p

मुंबई इंडियन्सची अंतिम फेरीत धडक

Patil_p

महाराष्ट्राच्या 21 व्या कबड्डी दिनाचा कौतुक सोहळा रद्द!

Patil_p

भारतीय बॉक्सिंग फेडरेशनला महामारीची चिंता

Patil_p

भारतीय हॉकीला हरजित, देविंदर यांची गरज : हरेंद्र सिंग

Patil_p

गिल, पंत, राहुल यांना संधी मिळणार

Patil_p
error: Content is protected !!