तरुण भारत

केपेत भाजप समर्थकांनी विरोधी उमेदवाराला रोखून धरल्याने तणाव

वार्ताहर/ केपे

केपे नगरपालिकेच्या प्रभाग 1 मधून भाजप उमेदवार चेतन हळदणकर यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करण्यासाठी आलेल्या गणपत गजानन नाईक या उमेदवाराला भाजप कार्यकर्त्यांनी केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच अडवून धरल्याने बराच काळ तणाव निर्माण झाला. शेवटी उपजिल्हाधिकाऱयांनी स्वतः खाली येऊन उमेदवाराला आत नेले व त्यानंतर नाईक यांनी अर्ज दाखल केला .

केपे पालिकेच्या काही प्रभागांतून भाजप समर्थक उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची तयारी चालली होती. यात प्रभाग 1, 2, 3 यात उमेदवार बिनविरोध निवडून येणार अशी चिन्हे शुक्रवारपर्यंत दिसत होती. सकाळी प्रभाग 2 मधून एकमेव अर्ज आलेला होता. मात्र या भाजप उमेदवाराचीही त्याच्या विरोधात नंतर अर्ज सादर केलेल्या उमेदवाराशी चक्क केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ बाचाबाची झाली. त्यानंतर दुपारी 12 पर्यंत 1 व 3 या प्रभागांतून भाजप उमेदवाराच्या विरोधात कुणी अर्ज भरला नव्हता.

मात्र प्रभाग 1 मधून नाईक हे माजी नगराध्यक्ष मानुएल कुलासो, एल्टन डिकॉस्ता, सांजिल डिकॉस्ता व इतर समर्थकांसोबत अर्ज सादर करण्याकरिता आले असता भाजप समर्थक असलेले जितू गावकर, सचिन कुंकळय़ेकर व अन्य काही कार्यकर्त्यांनी  नाईक यांना काही काळ अर्ज भरण्यापासून अडवून ठेवले. 12.30 च्या दरम्यान ही घटना घडली. 1 पर्यंत अडवून ठेवण्याचा प्रयत्न होता. मात्र त्यानंतर उपजिल्हाधिकाऱयांनी खाली येऊन उमेदवाराला आत नेले. त्यानंतर नाईक यांनी आपला अर्ज दाखल केला.

लोकशाहीची हत्या ः कुलासो

या घटनेचा केपेच्या काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष मानुएल कुलासो यांनी तीव्र निषेध करत ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे. कोणालाही अर्ज भरण्यापासून अडवून ठेवणे ही लोकशाहीची हत्याच आह, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. बराच काळ भाजप व काँग्रेस समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात उमेदवार नाईक यांच्या हातालाही बरीच इजा झाली असून उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर नाईक यांना उपचारांकरिता नेण्यात आले. नाईक प्रभाग 1 मधून अर्ज सादर करण्यास गेले असता फक्त भाजप समर्थकच नव्हे, तर काही भाजप समर्थक उमेदवारही अडवण्यास पुढे आले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. मात या घटनेमुळे  काही काळ बराच तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर भाजपकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रभाग 3 मधून माजी नगरसेविका सुचिता शिरवईकर यांची तेवढी बिनविरोध निवड पक्की झाली आहे. आणखी काही प्रभागांतून उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचे ठरविले होते. मात्र तसे झाले नाही.

Related Stories

होंडा नगरगाव केरी मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य सीलबंद

Patil_p

विजेचे ‘आरएमयू’ स्वप्न साकारु शकलो नाही

Patil_p

पर्वरी पोलीस वसाहतीतील जून्या इमारती मोडकळीस

Patil_p

काँग्रेसच्या दहा आमदारांसमवेत लॉरेन्सही भाजपात जाणार होते

Omkar B

सत्तरी तालुक्मयातील कोरोना पोझीटिव्ह रुग्णांची संख्या 7 वर

Omkar B

हल्लेखोर अद्याप मोकाटच

Patil_p
error: Content is protected !!