तरुण भारत

रिवण पंचायत पोटनिवडणूक प्रकाश गावकर बिनविरोध

प्रतिनिधी/ सांगे

सांगे तालुक्मयातील रिवण ग्रामपंचायतीच्या वॉर्ड 7 मध्ये रिवण जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांनी यशस्वी शिष्टाई केल्याने दोन उमेदवारांपैकी चंद्रिका मोलू गावकर यांनी शनिवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या प्रभागातून प्रकाश लक्ष्मण गावकर यांची पंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड पक्की झाली आहे.

केपेकर यांनी जिल्हा पंचायतीवर निवडून आल्यानंतर याच वॉर्डाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे 20 मार्चला पोटनिवडणूक घोषित झाली होती. प्रकाश गावकर व चंद्रिका गावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. केपेकर यांचा हा वॉर्ड असल्याने शुक्रवारी त्यांनी दोन्ही उमेदवारांमध्ये समेट घडवून आणला. त्यानुसार चंद्रिका यांनी अर्ज मागे घेतला. याबद्दल केपेकर यांनी चंद्रिका गावकर व त्यांच्या समर्थकांचे मनापासून आभार मानले आहे. तसेच प्रकाश गांवकर यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, भाटी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड सहामध्ये होणाऱया पोटनिवडणुकीसाठी दोघांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. कुणीही अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे तेथे विठ्ठल नाईक व सज्जन गोविंद नाईक यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे.

Related Stories

शुक्रवारी सापडले 190 नवे कोरोनाबाधित

Omkar B

वाळपई नगरपालिका मंडळाच्या कारभारावर समाधान

Patil_p

धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न सुटणार

Amit Kulkarni

वीज प्रकल्पाचा मोले गावाला फायदाच

Patil_p

गांजा लागवडीचा प्रस्ताव पुढे नेणार नाही

Amit Kulkarni

फातोडर्य़ात आज होणार बेंगलोरची लढत एटीके मोहन बागानशी

Amit Kulkarni
error: Content is protected !!