तरुण भारत

साखळी नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 9 मध्ये थेट लढत

प्रतिनिधी/ डिचोली

  साखळी नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 9 चे माजी नगरसेवक दामू घाडी यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या या प्रभागाच्या पोटनिवडणुकीत दोनच अर्ज अंतिम रिंगणात राहिल्याने भाजप विरुद्ध धर्मेश सगलानी यांच्या टुगेदर फॉर साखळी या गटांमध्ये निवडणूक रंगणार आहे.

   साखळी नगरपालिकेच्या 2018 साली झालेल्या निवडणुकीत हा प्रभाग ओबीसी राखीव करण्यात आला होता. सधर प्रभागाचे यापूर्वी नेतृत्व माजी नगरसेवक रियाझ खान यांच्याकडे होते. सदर प्रभाग राखीव झाल्याने रियाझ खान यांचा पत्त कट झाला होता. तर विर्डी भागाचे माजी नगरसेवक असलेल्या तसेच धर्मेश सगलनी गटाशी संलग्नित असलेल्या दामू घाडी यांना या प्रभागाची उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार दशरथ आजगावकर हेच होते.

   त्यावेळी दामू घाडी यांना 268 मते मिळाली होती. तर दशरथ आजगावकर यां?ना 122 व माजी नगरसेवक मिलींद रेळेकर यांना 71 मते मिळली होती. 146 मतांची आघाडी मिळवत दामू घाडी हे विजयी ठरले होते. या विजयात सगलानी पेनलकडून तसेच माजी नगरसेवक रियाझ खान यांनी मोठे योगदान दिले होते.

   यावेळी निवडणुकीत भाजपतर्फे मागील उमेदवार दशरथ आजगावकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर टुगेदर फॉर साखळी या पेनलतर्फे उमेदवार राजेंद्र आमेशकर यांना उमेदवारी देण्यात आले आहे. तर या प्रभागात तिसरा उमेदवार उतरला नसल्याने या दोन्ही उमेदवारांच्या मध्येच लढत रंगणार आहे.

Related Stories

म्हापसा पालिकेचे कर्मचारी सतावत असल्याचा व्यापाऱयांचा आरोप

Omkar B

वीज खात्यातील 24 कर्मचाऱयांची बडतर्फी कायम

Amit Kulkarni

पर्वरीत भटक्या जनावरांची वाढती समस्या

Patil_p

प्रो. फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा-गार्डीयन एँजल; स्पोर्टिंग-कळंगूट सामने बरोबरीत

Patil_p

कोनाडी व देवसू भाग स्वयंपूर्ण सील करण्याचा निर्णय

tarunbharat

बेतोडा येथे वीज खांबामुळे वाहतुकीला धोका

Omkar B
error: Content is protected !!