तरुण भारत

सांगेतून आणखी 26 उमेदवारी अर्ज सादर

प्रतिनिधी/ सांगे

सांगे नगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारी शेवटच्या दिवशी निर्वाचन अधिकारी सागर गावडे यांच्याकडे एकूण 26 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण 46 उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत. मावळत्या पालिका मंडळातील एकूण आठ माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने अधिकृतरीत्या पॅनल जाहीर केलेले नाही. मात्र भाजपने आठ प्रभागांमध्ये आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत अशी माहिती भाजपच्या गोटातून मिळाली.

अपेक्षेप्रमाणे माजी नगराध्यक्ष व आठ वेळा निवडून आलेले संजय (आबुली) रायकर यांनी प्रभाग 5 मधून उमेदवारी सादर केली आहे. राखीवतेविरुद्ध उच्च न्यायालयात गेलेले व तेथे न्याय मिळालेले माजी नगराध्यक्ष रुमाल्डो फर्नांडिस यांनी प्रभाग 6,  तर फौझिया शेख यांनी प्रभाग 8 मधून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. खरे चि<त्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपल्यावर कळणार आहे.

शनिवारी ज्यांनी अर्ज दाखल केले ते पुढीलप्रमाणे आहेत-प्रभाग 1 (अनुसूचित जमातींसाठी राखीव) कुलासो अनिता, प्रभाग 2-फर्नांडिस रोजमारिया, ज्ञानेश्वर नाईक, प्रभाग 3 (महिला)-फर्नांडिस आग्नेलो आंजेलिका, नाईक प्रतिमा, प्रभाग 4-क्रूझ पेदू, सैद अबसाफीर, गावकर गौरिशा गुरुदास, प्रभाग 5-शेट रायकर संजय कृष्णा, नाईक सूर्यदत्त, रायकर चिरंजय, प्रभाग 6 (ओबीसी)-फर्नांडिस जर्विस, रूमाल्डो फर्नांडिस, प्रभाग 7-नाईक जितेंद्र गजानन, लिमा ाdनपिएदाद, मास्कारेन्हस कॉस्तान्सियो, फर्नांडिस मिलाग्री, प्रभाग 8 (महिला)-शेख फौझिया, मराठे प्रीती, रायकर प्रतीक्षा प्रताप, प्रभाग 9 (ओबीसी महिला)-नाईक संचिता सुरेश, प्रभाग 10-गावकर प्रकाश देऊ, तारी अशोक, शिरोडकर सुरेश आनंद, नाईक तारी रोहन सदानंद, फर्नांडिस मायकल ग्रॅसियानो. शुक्रवारी ज्यांनी अर्ज भरले आहेत ते असे आहेत-प्रभाग 1 (अनुसूचित जमातींसाठी राखीव) मधून डायस ओलिंडा मिनिनो व कार्वाल्हो देवदिता व्हिक्मटोरिंनो, प्रभाग 2 झेवियर डिकॉस्ता, शुबर्ट फ्रांसिस्को मिंगेलिनो, कोसंबे संदेश नारायण, डिकॉस्ता मेश्यू आग्नेलो, प्रभाग 3 (महिला) फर्नांडिस क्लिओपात्रा आग्नेलो, प्रभाग 4 पेरेरा जॉन रूझारियो, सय्यद इक्बाल जाफर, प्रभाग 5 रायकर संजय (आबुली) कृष्णा, प्रभाग 6 (ओबीसी) फर्नांडिस फ्लॅटचेर गाब्रियल, फर्नांडिस जर्विस, नाईक तारी किमया कल्पित, प्रभाग 7 मधून मास्कारेन्हस कार्मिनो कायतानो, क्रूझ कॅरोज, प्रभाग 8 (महिला) फर्नांडिस सिंथिया ज्योकीम पॉल, करमळकर संजना तुषार, प्रभाग 9 (ओबीसी महिला) सांगेकर कामाक्षी दत्तप्रसाद, नाईक तारी श्वेता सुप्रज, तर प्रभाग 10 मधून फर्नांडिस मायकल आवेलिनो व प्रकाश देऊ गावकर. शनिवारी चार

Related Stories

कुडचडे नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार ?

Amit Kulkarni

सुरेंद्र वसंत सिरसाट निवर्तले

Amit Kulkarni

दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचाच झेंडा

Patil_p

‘सदृढ कुटुंब सदृढ समाज’ जागृती मोहीम आजपासून

Amit Kulkarni

उज्ज्वला योजनेतर्गंत ग्राहकांना तीन महिने मोफत सिलिंडर

Patil_p

चरावणे,हिवरे,गोळावली,रिवे गावात अस्वलांचा वावर वाढला

Omkar B
error: Content is protected !!