तरुण भारत

सांगली : शिराळा येथील भूईकोट किल्ल्याची खा. धैर्यशील मानेंनी केली पाहणी

प्रतिनिधी / शिराळा

शिराळा येथील भूईकोट किल्ल्याला हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खा.माने म्हणाले, भूईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक होण्याच्या दृष्टीने सरकार सकारात्मक आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. शिराळा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात संभाजीराजे यांचा अश्वारूढ पुतळा, छत्रपती संभाजीराजे यांचा जन्मा पासून जीवनपरिचय असा शिल्प रुपी इतिहास मांडण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक आराखडा आठ दिवसात तयार झाला की नियोजन करण्यासाठी बैठक घेऊ अशी माहिती खासदार धैर्यशील माने व आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. येथील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज स्मृतिस्थळा च्या नियोजनासाठी पाहणी दौऱ्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुनीता निकम उपस्थित होत्या.

Advertisements

Related Stories

सांगली : …अन्यथा लिंगायत समाजातील मृतदेह महापालिकेत आणून ठेवणार

Abhijeet Shinde

सांगली : पोलीस अधीक्षक `ऍक्शन मोड’मध्ये

Abhijeet Shinde

बुधगावच्या नवीन पाणी योजनेची यशस्वी चाचणी

Abhijeet Shinde

जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाकडून मिरजेत अनेक दुकानांवर कारवाई

Abhijeet Shinde

सहकार तपस्वी गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सोहळ्याचा श्रीगणेशा मुंबईत

Abhijeet Shinde

सांगली : मणेराजूरीत चोरट्यांचा धुमाकूळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!