तरुण भारत

टी.लालरिनसांगा डब्ल्यूबीसी युवा वर्ल्ड चॅम्पियन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विश्व मुष्टीयुद्ध मंडळातर्फे ऐझवाल येथे शनिवारी झालेल्या विश्व युवा सुपर फिदरवेट गटातील जेतेपदाची लढत भारतीय मुष्टीयोद्धा टी.लालरिनसांगाने जिंकताना घानाच्या इरीक क्युयामचा पराभव केला.

Advertisements

सदर लढत विश्व मुष्टीयुद्ध मंडळाचे अध्यक्ष मॉरिसिओ सुलेमान यांनी भारतीय मुष्टीयद्ध मंडळाच्या तांत्रिक निरीक्षणाखाली आयोजित केली होती. या लढतीत नियोजित केलेल्या तीन पंचांनी लेयुला 80-72, 80-72, 80-72 अशा गुणांनी विजय म्हणून घोषित केले. ही लढत ग्रासरूट बॉक्सिंग प्रमोशनचे प्रमुख कमल मुजतबा आणि एलपीएल व्हिजन प्रॉडक्शनचे प्रमुख एस. लाल यांच्या संयोगाने आयोजित केली होती. या लढतीला मिझोरामचे क्रीडामंत्री रॉबर्ट रॉयते उपस्थितीत होते. मिझोरामच्या लेयुकडे या फिदरवेट गटातील हे जेतेपद आता पुढील तीन महिन्यासाठी कायम राहील.

Related Stories

टी-20 क्रमवारी – कोहलीची प्रगती, राहुल स्थिर

Patil_p

मास्टर ब्लास्टर सचिनचा उद्या बर्थ डे : कोरोना संकटामुळे सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय 

prashant_c

रशिया संघाकडे एटीपी टेनिस चषक

Patil_p

केनिन-स्वायटेक यांच्यात आज जेतेपदाची लढत

Patil_p

थिएम उपांत्यपूर्व फेरीत, नदाल शेवटच्या 16 खेळाडूंत

Amit Kulkarni

दिल्लीचा मुंबई इंडियन्सला पराभवाचा ‘शॉक’!

Patil_p
error: Content is protected !!