तरुण भारत

भारतीय महिला क्रिकेट संघाचा मोठा पराभव

वृत्तसंस्था/ लखनौ

सध्या दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ भारताच्या दौऱयावर पाच सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी आला आहे. रविवारी झालेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान भारताचा 8 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. दीर्घ ब्रेकनंतर भारतीय महिला क्रेकेट संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन या पराभवाने झाले आहे.

Advertisements

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 50 षटकांत 9 बाद 177 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 40.1 षटकांत 2 बाद 178 धावा जमवित हा सामना 8 गडय़ांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेची गोलंदाज शबनीम इस्माईलने 28 धावांत 3 गडी बाद करत सामनावीराचा पुरस्कार मिळविला.

भारतीय संघाच्या डावात कर्णधार मिताली राजने 85 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 50, हरमनप्रित कौरने 41 चेंडूत 6 चौकारांसह 40, दीप्ती शर्माने 46 चेंडूत 3 चौकारांसह 27, स्मृती मानधनाने 3 चौकारांसह 14, झुलन गोस्वामीने 4, मोनिका पटेलने 4, पुनम यादवने नाबाद 9 धावा केल्या. भारताच्या डावात 1 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे शबनीम इस्माईलने 28 धावांत 3, मेल्बाने 41 धावांत 2, कॅप, खाका आणि लुस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्त्युत्तरादाखल खेळताना लिझेली ली आणि लॉरा वुलवार्ट या जोडीने सलामीच्या गडय़ासाठी 37.1 षटकांत 169 धावांची भागिदारी केली. वुलवार्टने 110 चेंडूत 12 चौकारांसह 80 धावा झोडपल्या. संघाला विजयासाठी केवळ 9 धावा बाकी असताना वुलवार्ट गोस्वामीच्या गोलंदाजीवर पायचीत झाली. त्यानंतर कर्णधार लुस गोस्वामीच्या गोलंदाजीवर शर्माकरवी झेलबाद झाली. तिने केवळ एक धाव जमविली. ली आणि गुडॉल यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. ली ने 122 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 83 धावा झळकविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 1 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे गोस्वामीने 38 धावांत 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक ः भारत 50 षटकांत 9 बाद 177 (मिथाली राज 50, कौर 40, दिप्ती शर्मा 27, स्मृती मंदाना 14, पुनम राऊत 10, झुलन गोस्वामी 4, पुनम यादव नाबाद 9 शबनीम इस्माईल 3-28, मेल्बा 2-41, केप, खेका, लुस प्रत्येकी एक बळी). दक्षिण आफ्रिका 40.1 षटकांत 2 बाद 178 (लिझेली ली नाबाद 83, वुलव्हर्ट 80, लुस 1, गोस्वामी 2-38).

Related Stories

अमेरिकन टेनिस स्पर्धेतून नेव्हारोची माघार

Patil_p

भारत-ब्रिटन पुरूष हॉकी सामना बरोबरीत

Patil_p

भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

222 कोटींच्या बोलीसह ड्रीम 11 यंदाचे आयपीएल प्रायोजक

Patil_p

न्यूझीलंड-विंडीज पहिली कसोटी आजपासून

Omkar B

महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!