तरुण भारत

विनेश फोगटला सुवर्णपदकासह अग्रस्थान

वृत्तसंस्था/ रोम

येथे झालेल्या मॅटेव पेलिकोन मानांकन महिलांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताच्या विनेश फोगटने आपल्या वजनगटात सुवर्णपदक मिळवित पुन्हा मानांकनातील अग्रस्थानही पटकाविले. गेल्या दोन आठवडय़ाच्या कालावधीतील विनेशचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.

Advertisements

भारताची 26 वर्षीय महिला मल्ल विनेश फोगटने येत्या जुलैमध्ये होणाऱया टोकियो ऑलिंपिकसाठी आपली पात्रता यापूर्वीच सिद्ध केली आहे. विश्व कुस्ती स्पर्धेत 53 किलो वजनगटात विनेश फोगटने यापूर्वी कास्यपदक मिळविले आहे. रोममध्ये झालेल्या 53 किलो वजनगटातील अंतिम लढतीत विनेशने कॅनडाच्या डायना विकेरचा 4-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. गेल्या आठवडय़ात विनेशने किव्ह येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. आता तिने विश्व महिलांच्या 53 किलो वजनगटातील मानांकनात अग्रस्थान पटकाविले आहे. कॅनडाची डायना विकेर या मानांकनात आता दुसऱया स्थानावर आहे. शनिवारी या स्पर्धेत भारताच्या सरिता मोरने 57 किलो वजनगटात रौप्यपदक मिळविले होते.

Related Stories

असा ‘खडूस’ गोलंदाज पुन्हा होणे नाही!

Patil_p

प्लिस्कोव्हा, स्वायटेक, साबालेन्का चौथ्या फेरीत दाखल

Patil_p

सोनम, दीपक, रवि , जितेंदर यांची माघार

Patil_p

बेंगळूर एफसीचा ईगल्सवर निसटता विजय

Patil_p

सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धा रद्द, सायना, श्रीकांत ऑलिम्पिकला मुकणार

Patil_p

भारताचे इंग्लंडला 368 धावांचे आव्हान

Patil_p
error: Content is protected !!