तरुण भारत

चारा छावणी भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

प्रतिनिधी/ दहिवडी

माण तालुका चारा छावणी भ्रष्टाचार प्रकरणी दहिवडी न्यायालयाचे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश याबाबत हकीगत अशी की या प्रकरणी शिवसेनेचे उपजिल्हाध्यस संजय भोसले यांनी दहिवडी न्यायालयात खाजगी खटला  

Advertisements

       येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो. यांचे  कोर्टात भा.द.वि कलम 420,409,406,408,467,468,201,120/बी प्रमाणे   . तत्कालीन 1 )तहसिलदार, 2 ) मंडलाधिकारी 3 ), तलाठी , 4 )ग्रामसेवक  5 )कृषी सहाय्यक 6 )-चेअरमन व-7 )सचिव ,वि.का.सेवा.सह. सोसायटी

बिजवडी याच्यांविरुद्ध  अ.नं.क्र.  1 ते 7  यांचेवरती 156(3) प्रमाणे गुन्हे दाखल करणेत यावेत  अशी खाजगी फिर्याद संजय भोसले यांनी . दहिवडी कोर्टात दाखल केली होती. त्यानुसार

      मे.न्यायदंडाधिकारी मा.अमितसिंह मोहने  यांनी  6/3 /2021 च्या  केलेल्या आदेशाने सोसायटी ञ्चेअरमन व सचिव यांचेवरती गुन्हे दाखल करण्याचे  दहिवडी पोलिसांना आदेश दिलेअसून , क्र 1 ते 5 हे सरकारी नोकर असून कलम 197 अन्वये  या प्रकरणाच्या तपासामध्ये  यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काही संबंध दिसून आलेस त्यांचे वरीष्ठ कार्यालयांची परवानगी घेऊन  अ.क्र 1 ते 5 यांचेवरती गुन्हे दाखल करणेत यावेत  असे आदेश करणेत आले आहेत. या फिर्यादीचे काम ऍड. नितीनजी गोडसे (वडूज) व  ऍड.मिनेश पाटील (दहिवडी ) यांनी पाहीले. 

      आरोपी क्र 1 ते 5 यांचेबाबत माझेकडे कागदोपत्री कायदेशीर सबळ पुरावे असून , छावणीतील भ्रष्टाचार प्रकरणामध्ये ईतरही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष  हात असलेले अधिकारी व  सर्व संस्था यांच्यावरती गुन्हे दाखल करणेत यावेत  यासाठी विशेष व वरिष्ठ  न्यायालयामध्ये दाद मागणार असून. जेणेकरुन या प्रकरणाचा उलघडा होऊन बडे मासे जाळ्यात अडकून भ्रष्टाचाराचा भांडाफोड  होतानाच बिमोड होण्यास मदत होईल असे निवेदनामध्ये सरतेशेवटी संजय भोसले शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी म्हटले आहे.

Related Stories

सातारा : पालिकेच्या व्यापारी संकुलात आढळला बेवारस मृतदेह

datta jadhav

यमगेतील पाण्याचे 24 पैकी 23 नमुने दूषित: गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या 467

Abhijeet Shinde

आगामी काळात त्रिशंकू भागाचा कायापालट करणार

Patil_p

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात 6 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

कोरोना योध्या ना संगीतातून जावलीच्या युवकाची साथ

Patil_p

सातारा : जिल्हा परिषदेत 32 जणांना पदोन्नती

datta jadhav
error: Content is protected !!