तरुण भारत

दाडाचीवाडी धारगळ येथे उपमुख्यमंत्री बाबू आजगावाकर यांचा निषेध

प्रतिनिधी / पेडणे

धारगळ ते मोपा येथे होणाऱया राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी  गेलेल्या शेतकऱयांचा या रस्त्यासाठी तीव्र विरोध असून याबाबत गेले अनेक दिवस सरकारच्या विरोधात हे पिडित  शेतकरी आंदोलन करत होते.

Advertisements

काल पञकार परिषद घेऊन पेडणे मतदारासंघाचे आमदार तथा गोवा राज्याचे उपमुख्यमंञी  बाबू आजगावाकर  यांनी पिडित शेतकऱयांना न्याय तसेच हा रस्ता रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव आणून हा रस्ता रद्द केला  नाहीतर  त्यांना यापुढे काळे बावटे तसेच घेरावा घालणार असा इशारा दिला होता. आज दाडाचीवाडी धारगळ येथे  एका कार्यक्रमाला राञी उपमुख्यमंञी आले असता कार्यक्रम आटपून जात असताना शेतकऱयांनी त्यांना काळे बावटे दाखवून घोषणा  बाबू आजगावकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा  दिल्या. बाबू गो बॅक असे फलक हातात धरुन महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या .

पिडित शेतकरी यावेळी मोठय़ा संख्येने दाडाचीवाडी धारगळ येथे जमले. पुरुष महिला यांनी बाबू आजगावकर यांच्या निषेधाचे फलक हातात धरुन कार्यक्रम स्थळावरून बाबू आजगावकर यांची गाडी मुख्य रस्त्यावर आली असता जोरदार घोषणा दिला.

Related Stories

सांकवाळच्या सरपंचपदी गिरीष पिल्ले यांची पुन्हा बिनविरोध निवड

Amit Kulkarni

भूमिपुत्र विधेयक न्यायालयात होणार रद्द

Amit Kulkarni

‘मास्क’ न वापरल्या प्रकरणी दक्षिण गोव्यात 3636 जणांवर कारवाई

Omkar B

काणकोणात आज ‘प्रशासन जनतेच्या दारात’ उपक्रम

Amit Kulkarni

पणजीसाठी भाजपमध्ये तिरंगी धुसफूस

Amit Kulkarni

डिचोलीचे नगरसेवक निलेश टोपले यांचा भाजपप्रवेश

Patil_p
error: Content is protected !!