तरुण भारत

वारकरी सांप्रदायाच्या भजनाने निघाली ग्रंथदिंडी

विविध मान्यवरांना साहित्य संमेलनात पुरस्कारांचे वितरण : ग्रंथदिंडी ठरली संमेलनाचे आकर्षण

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथदिंडी सोहळय़ाचे आयोजन करण्यात येते. दरवषी येळ्ळूर महाराष्ट्र हायस्कूल येथून या दिंडीला प्रारंभ होतो. मात्र कोरोनामुळे शिवाजी विद्यालयापासून यावषी ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली. अनिल आजगावकर यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले.

वारकरी सांप्रदाय भजनाच्या माध्यमातून ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. वडगाव येथील ज्ञानेश्वरी भजनी मंडळाने या ग्रंथदिंडीमध्ये भाग घेतला होता. संमेलन नगरीजवळ ग्रंथदिंडी पोहचताच दिवंगत वाय. बी. चौगुले संमेलन नगरीचे उद्घाटन तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिवंगत पैलवान मारुती कुगजी सभागृहाचे उद्घाटन
ऍड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. स्वामी विवेकानंद विचारपीठाचे उद्घाटन ऍड. शाम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

दीपप्रज्वलन ज्येष्ट पत्रकार अनिल आजगावकर, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, उद्योजक अशोक नाईक, ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील, ग्रा. पं. माजी उपाध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी, ग्रा. पं. माजी सदस्य राजू पावले, मुकुंद घाडी यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवप्रतिमेचे पूजन ता. पं. सदस्य रावजी पाटील, महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन दुदाप्पा बागेवाडी, भरत मासेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती प्रतिमेचे पूजन निवृत्त कॅप्टन नारायण महादेव पाटील, ज्ञानेश्वरी प्रतिमेचे पूजन शिक्षक कृष्णा एन. पाटील, संत तुकाराम प्रतिमेचे पूजन कृष्णा बिजगरकर, गुरुवर्य गावडोजी पाटील प्रतिमेचे पूजन ग्रा. पं. सदस्या शांता काकतकर, राष्ट्रवीरकार गुरुवर्य शामराव देसाई प्रतिमेचे पूजन नारायण काकतकर यांनी केले.

साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. गोरल यांनी साहित्य संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत डॉ. तानाजी पावले यांनी केले. उद्योजक अशोक नाईक यांनी उद्घाटन भाषण केले. यावेळी त्यांनी भाषेचे महत्त्व सांगितले. साहित्य संमेलन संघाचे अध्यक्ष बाळू मोटराचे यांनी ठराव मांडला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मराठी भाषिकांना न्यायाची प्रतीक्षा लागली आहे. तेव्हा महाराष्ट्र सरकारने अधिक लक्ष देऊन सीमावासियांना न्याय द्यावा, असा ठराव मांडण्यात आला. त्याला टाळय़ा वाजवून पाठिंबा देण्यात आला.

दुसऱया ठरावामध्ये मराठी भाषिक अल्पसंख्याक आहोत. तेव्हा मराठीतून सर्व शासकीय परिपत्रके द्यावीत, मराठी शिक्षण संस्थांना अनुदान द्यावे, असा ठराव मांडण्यात आला.

विविध मान्यवरांना श्रद्धांजली

गेले 101 दिवस शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. आंदोलनामधील 200 हून अधिक शेतकरी मरण पावले आहेत. त्यामुळे याप्रसंगी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याचबरोबर निंगाप्पा मोटराचे, अनुसया मोटराचे, वाय. बी. चौगुले यांच्यासह गावातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.

साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा आणि कृषी पुरस्कार वितरण

दरवषी साहित्य संमेलनामध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार प्रा. नवनाथ शिंदे (आजरा), कै. मारुती पाटील (पेंटर) सामाजिक पुरस्कार डॉ. डी. एन. मिसाळे, रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्कार डॉ. वैशाली कित्तूर, गुरुवर्य गावडोजी पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्याध्यापक मोहन पाटील, दिवंगत कृष्णा मुचंडी पत्रकारिता पुरस्कार श्रीकांत काकतीकर, क्रीडा पुरस्कार मारुती घाडी, विद्यार्थी क्रीडा पुरस्कार सानिका प्रभाकर चिठ्ठी, कृषी पुरस्कार भुजंग पावले यांना देण्यात आले.

Related Stories

घर पडलेल्या कुटुंबीयांना-शेतकऱयांना तातडीने मदत करा

Patil_p

जिल्हय़ातील 32 जणांना कोरोनाची बाधा

Patil_p

जमीन संपादित झाली तर आंदोलन

Amit Kulkarni

बुधवारी 301 पॉझिटिव्ह तर 11 जण दगावले

Patil_p

नवी गल्ली, शहापूर येथे शिवजयंती

Patil_p

कोळसा पावडर वाहतूक करणाऱया ट्रकला आग

Patil_p
error: Content is protected !!